'या' देशांमध्ये सरकार नागरिकांवर मेहेरबान; इथं Tax म्हणून 1 ₹ सुद्धा नाही आकारला जात, आताच पाहा संपूर्ण यादी

Tax Free Countries: तुम्हाला माहितीयेत का, जगभरात असेही काही देश आहेत जिथं ही चिंताच नाहीय.   

Dec 24, 2024, 10:47 AM IST

Tax Free Countries: भारतामध्ये Income Tax हे अनेकांचच दुखणं... पगारातील एक मोठा भाग या कर स्वरुपात भरावा लागत असल्यामुळं ही नोकरदार मंडळी बरीच चिंतेत दिसते. 

1/7

कमाल

google List of Tax Free Countries in 2024

Tax Free Countries: तुम्हाला माहितीयेत का, जगभरात असेही काही देश आहेत जिथं कर भरण्याची चिंताच नाहीय. 

2/7

कर

google List of Tax Free Countries in 2024

जाणून आश्चर्य वाटेल, पण जगात असेही काही देश आहेत जिथं नागरिकांकडून कर आकारला जात नाही. म्हणजेच इथं कितीही पैसे कमवा, सरकार तुमच्याकडून कर स्वरुपात एक रुपयाही घेणार नाही. 

3/7

कॉर्पोरेट टॅक्स

google List of Tax Free Countries in 2024

Tax Free देशांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांना त्या देशात कॉर्पोरेट टॅक्सही भरावा लागत नाही. 

4/7

देशाचा खर्च

google List of Tax Free Countries in 2024

बरं, या सगळ्यामध्ये करमुक्ती असली तर मग या देशाचा खर्च चालतो कसा? देशाच्या तिजोरीवर याचा ताण नाही का येत? हासुद्घा एक प्रश्नच... 

5/7

करमुक्त देश

google List of Tax Free Countries in 2024

उपलब्ध माहितीनुसार या करमुक्त देशांमध्ये अर्थार्जनासाठी पर्यटनाला वाव दिला जातो. जेव्हा पर्यटक या देशातील भटकंतीनंतर माघारी निघतात तेव्हा त्यांच्याकडून परतीच्या प्रवासासाठीही कर आकारला जातो.   

6/7

करमुक्त देश

google List of Tax Free Countries in 2024

2024 या वर्षामध्ये संयुक्त अरब अमिरातीपासून वानुअतूपर्यंत काही देशांना करमुक्त करत या देशात विविध विभाग सेल्फ वर्किंग मॉडलवर काम करत असल्याचं स्पष्ट झालं.   

7/7

देशांची नावं

google List of Tax Free Countries in 2024

मुळात कर आकारण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असते. उदाहरणार्थ तेलाचे साठे असणारे देश त्यांच्या नागरिकांवर कर न आकारण्याची मुभा वापरू शकतात. हे देश तेल आणि नैसर्गिक वायूच्या राजस्वावर अवलंबून राहू शकतात. राहिला मुद्दा कोणत्या देशांमध्ये कर आकारला जात नाही, तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती, बहामास, कतर,  वानुअतु, बहरीन, सोमालिया, ब्रुनेई, बहरीन.