अनंत अंबानींची मेहुणी आहे तरी कोण? सौंदर्यासोबत सांभाळते करोडोंचं साम्राज्य

Anjali Merchant Photos : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा भारताच नाही तर संपूर्ण जगभरात झाली. या लग्नात अनंत अंबानींची मेहुणीची तुफान चर्चा झाली. 

Saurabh Talekar | Aug 15, 2024, 19:16 PM IST
1/5

राधिका मर्चंटची बहीण

अंबानीची मेहुणी आणि राधिका मर्चंटची बहीण अंजली मर्चंट मजिठियाच्या लूकची तुफान चर्चा सुरू झाली होती. वीरेन मर्चंट आणि पत्नी शैला मर्चंट यांची अंजली मोठी मुलगी आहे.

2/5

व्यवसाय

अंजली यांनी बॅबसन कॉलेजमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि उद्योजकतेमध्ये बीएससीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत व्यवसाय सुरू केला.

3/5

सहसंस्थापिका

अंजली 'टर्न द कॅम्पस' या ऑनलाइन मार्केटप्लेसची सहसंस्थापिका आहे. तसेच 'ड्रायफिक्स'चीही सहसंस्थापिकेची जबाबदारी त्या सांभाळतात. 2020 मध्ये अंजली यांनी बिझनेसमॅन अमन मजिठियाशी लग्न केलं. 

4/5

अमन मजिठीया

अमन मजिठियाशी कपड्यांच्या ब्रँडचे संस्थापक आहेत. अंजली आणि राधिका या दोघींमधील बॉन्डिंग कायमच दिसून आलंय. अंजली मर्चंट यांचे पती अमन मजिठीया हे देखील करोडपती आहेत. 

5/5

गोंडस मुलगा

दरम्यान, अंजली मर्चंट आणि अमन मजिठिया यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. अंजलीचे सोशल मीडियावर त्याच्यासोबतही काही फोटो व्हायरल होत असतात.