'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट

घनदाट केस हीसुद्धा सौंदर्याची एक परिभाषा आहे.  लांबसडक व घनदाट केसांसाठी शरीराला अनेक पोषक तत्वे गरजेचे असतात. जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमी जाणवते त्याचा परिणाम केसांवरही होतो. केस पातळ होण्यामागे व गळण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हेदेखील कारण असू शकते. 

Dec 01, 2023, 18:25 PM IST

Vitamin Deficiencies For Hair Loss: घनदाट केस हीसुद्धा सौंदर्याची एक परिभाषा आहे.  लांबसडक व घनदाट केसांसाठी शरीराला अनेक पोषक तत्वे गरजेचे असतात. जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमी जाणवते त्याचा परिणाम केसांवरही होतो. केस पातळ होण्यामागे व गळण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हेदेखील कारण असू शकते. 

1/7

'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

केस गळतात, केस पातळ झालेत किंवा केस विंचारताना तुटतात अशा अनेक समस्या तुम्हाला जाणवतात का. तर या मागे कारण आहे ते म्हणते तुमच्या शरीरात असलेली व्हिटॅमिनची कमतरता. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि आयर्नच्या कमतरतेमुळं केस पातळ होतात. 

2/7

व्हिटॅमिन ए

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

 व्हिटॅमिन ए केसांची निगा राखण्यास खूप आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळं केस गळणे, पातळ होणे, केस पांढरे होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

3/7

व्हिटॅमिन सी

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

केसांच्या वाढीसाठी आणि कोलेजनच्या उत्पादनासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे केस गळणे, पातळ होणे आणि कोंडा होऊ शकतो.

4/7

व्हिटॅमिन ई

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून व्हिटॅमिन ई बचाव करते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळं केस गळणे, पातळ होणे आणि कोंडा यासारख्या समस्या निर्माण होतात. तर, आयर्नच्या कमतरतेमुळं केस झडणे आणि केस पातळ होणे यासारख्या समस्या होतात. 

5/7

नारळाचे तेल

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

नारळाचे तेल हे केसांसाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे. नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमीन ईसारखे घटक असतात. जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. नारळ तेल थोडेसे गरम करुन केसांना लावा आणि एक तासांनी केस धवून घ्या. 

6/7

कांद्याचा रस

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

कांद्याचा रस केसांसाठी खूप प्रभावी उपाय आहे. कांद्याच्या रसात सल्फर असते. जे केसांच्या वाढ होण्यास मदत करते. कांद्याचा रस केसांना 30 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि त्यानंतर केस धवून घ्या. 

7/7

अंड

Which vitamin deficiency can cause hair thinning 3 best home remedies in marathi

अंड हे केसांसाठी उत्तम पोषण आहे. अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 2 असतात, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. केसांना अंड्याचा गर लावून ठेवा आणि 30 मिनिटांनी धुवा.