गूळ, साखर की मध? कोणता गोड पदार्थ आरोग्याला जास्त फायदेशीर

Sweetners For Good Health: अनेकांना हेल्दी, चविष्ट पदार्थांपेक्षा गोड खाण्याला जास्त पसंती देतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. पण गोड पदार्थामधील मध, गूळ की साखरमधील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या...

Apr 27, 2023, 18:22 PM IST
1/6

साखर

जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. पण, अन्नात साखरेचा अतिरेक केल्याने वजन क्षणार्धात वाढू लागते. साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेहाची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला गोड पदार्थ खायचे नसतील आणि निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात नैसर्गिक साखरेचा समावेश करावा. त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही.

2/6

ब्राउन साखर

ब्राउन साखर किंवा साखर कोणताही प्रकार चव आणि पोत यावर अवलंबून असते. ब्राउन साखर कारमेल चव असलेल्या कोणत्याही पदार्थासाठी एक चांगला पर्याय आहे. साखर अतिशय गोड असल्याने ती कारमेलची चव देऊ शकत नाही. 

3/6

मध

मध हा देखील एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. त्यात भरपूर पोषक असतात. तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता. यामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही. पण आजकाल मूळ मध बाजारात मिळत नाही. यामुळे मध खरेदी करताना विशेष काळजी घ्या. 

4/6

खजूर

तुम्ही साखरेऐवजी खजूर वापरू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. आपण ते फक्त सिरप स्वरूपात वापरू शकता. खजूर खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे खजूरचा आहारात समावेश करा.

5/6

नारळ

नारळापासून साखर तयार केली जाते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फ्रक्टोज मुबलक प्रमाणात असतात. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तुम्ही ते चहा किंवा कॉफीमध्ये वापरू शकता. 

6/6

गूळ

गूळ हा एक नैसर्गिक गोड आहे. गूळ हा उसापासून बनवले आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. विशेष म्हणजे गुळाच्या मदतीने आपण घरच्या घरी अतिशय चविष्ट पदार्थ बनवू शकतो.