OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार Bhool Bhulaiyaa 3?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनं हा गेल्या अनेक दिवसांपासून 'भूल भुलैया 3' या चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

| Dec 07, 2024, 13:18 PM IST
1/7

'भूल भुलैया 3' प्रदर्शित होऊन 1 महिना झाला असला तरी चित्रपटगृहात प्रेक्षक हजेरी लावताना दिसत आहेत. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट आता कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आणि कधी होणार हे जाणून घेऊया. 

2/7

जे चाहते या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची प्रतीक्षा करत होते. त्यांचा प्रतीक्षेचा अंत झाला असं म्हणता येईल. कारण चित्रपटगृहानंतर आल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3/7

'भूल भुलैया 3' हा लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्ही 27 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहु शकता. 

4/7

'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यनसोबत तृप्ति डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्या सगळ्यांनी त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक व्यक्ती त्याच्या अभिनयाची स्तुती करत आहेत. 

5/7

कार्तिकचा चित्रपटात एक नवा लूक पाहायला मिळत आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' हे चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले. 

6/7

हे दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्यानं  बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम झाल्याचे म्हटले जाते. पण असं असलं तरी देखील 'भूल भुलैया 3' नं 'सिंघम अगेन' वर मात केली.

7/7

(All Photo Credit : Social Media)