Kitchen Tips : तळणीच्या तेलाचा वापर पुन्हा करताय का? मग वाचा ही बातमी!

Reuse your cooking oil : पावसाळा असो किंवा इतर कोणताही सण, घरी जेवण बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी तेलाचा वापर करतो. मात्र अशावेळी पदार्थ तयार केल्यानंतर बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो. यानंतर हे तेल भाजी, पराठे, पुर्‍या किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे किती धोकादायक आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चला तर जाणून घेऊया...  

May 31, 2023, 16:37 PM IST
1/6

तेल पुन्हा पुन्हा वापरू नये?

Reuse your cooking oil

एकदा वापरलेले स्वयंपाकाचे तेल पुन्हा वापरू नये, कारण ते खराब होऊ लागते आणि तेलात ट्रान्स-फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. विशेषत: थंड तेल पुन्हा गरम करणे टाळा, कारण त्यात स्मोकिंग पॉइंट्स खूप कमी आहेत.  

2/6

Reuse your cooking oil

जेव्हा तुम्ही तेल पुन्हा वापरता तेव्हा ते फ्री रॅडिकल्स तयार करू शकते आणि ते दीर्घकाळ वापरणे तुमच्यासाठी हानिकारक आहे. हे फ्री रॅडिकल्स कार्सिनोजेनिक असू शकतात, ज्याचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. याशिवाय कोलेस्ट्रॉल इत्यादी समस्या वाढण्याची शक्यता असते. अनेकांना छातीत जळजळ आणि हृदयाशी संबंधित आजारही होतात.   

3/6

Reuse your cooking oil

वापरलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅट असते, जे शरीरासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. ते खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते. परिणामी, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो.

4/6

Reuse your cooking oil

वापरलेले स्वयंपाक तेल अल्डीहाइड्ससारखे अनेक विषारी पदार्थ सोडते, जे हृदयासाठी हानिकारक असतात आणि अल्झायमर, स्ट्रोक, कर्करोग, पार्किन्सन आणि यकृताच्या समस्यांचा धोका वाढवतात.  

5/6

Reuse your cooking oil

जर तुम्हाला अनेकदा गॅसची समस्या होत असेल किंवा पोटात जळजळ होत असेल तर यासाठी स्वयंपाकात वापरले जाणारे तेलही कारणीभूत ठरू शकते. स्ट्रीट फूड रेस्टॉरंटमध्ये हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. यामुळेच बाहेरचे अन्न खाल्ल्याने लोकांना आतड्यांचा त्रास होतो.  

6/6

Reuse your cooking oil

जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल, तर तुम्ही खासकरून पाम तेलाचे असे स्वयंपाकाचे तेल वापरणे टाळावे. यामुळे तुमच्या अडचणी आणखी वाढू शकतात. तसेच खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.