'काही वेळासाठी मजा केली, पण मग'....', जेव्हा रेखा यांच्याशी जोडलं गेलं 'या' पाकिस्तानी दिग्गजाचं नाव

पडद्यावर रोमांचक भुमिका साकारणाऱ्या रेखा यांना खऱ्या आयुष्यातसूद्धा बऱ्याच चर्चांना सामोरे जावे लागले. त्यांचे नाव आत्तापर्यंत पाच-सहा जणांशी जोडले गेले आहे. मात्र एक नाव असे आहे ज्यावर विश्वासच नाही बसणार.    

Sep 24, 2024, 17:30 PM IST

रेखा हे भारतीय सिनेसृष्टीतील एक फार प्रसिद्ध नाव आहे. त्यांना त्यांच्या सौंदर्यासाठी, अभिनयासाठी आणि खास करून नृत्यासाठी ओळखलं जाता. या ओळखीबरोबरच रेखा त्यांच्या लव्ह लाईफसाठीसूद्धा कायम चर्चेत असतात.   

1/6

रेखा कायमच चर्चेत

अमिताभ आणि रेखा यांची अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी, सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. रेखा त्यांच्या 'बोल्डनेस'साठी आणि 'एव्हरग्रीन' सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. रेखा सतत त्यांच्या मुलाखतींमधून त्यांचे 'प्रगल्भ' विचार मांडत असतात. बॉलिवू़डच्या विश्वातील रेखा हे फार मोठे नाव आहे

2/6

रेखा आणि मुकेश

1990 साली रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. मात्र लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनंतर त्यांनी आत्महत्या केली. तेव्हापासून रेखा 'सिंगल लाईफ' जगत आहेत. रेखा यांचे 'लव्ह लाईफ' कायमच चर्चेचा विषय बनले आहे. अर्थात त्याचा त्यांच्या प्रसिद्धीवर फार परिणाम कधी झाला नाही.

3/6

पाकिस्तानचे माजी कर्णधार

रेखा फक्त भारतातच नाही तर, पाकिस्तानातही नावाजलेल्या आहेत. त्यांचे चाहते सीमेपलीकडेही आहेत. रेखा यांचे नाव एका अशा व्यक्तीशी जोडले गेले होते, ज्यावर विश्वासच बसणार नाही. हे नाव आहे पाकिस्तानला 1992 चे विश्वचषक जिंकवून देणारे, माजी कर्णधार 'इम्रान खान'. या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी रेखा यांचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या फार चर्चेत होत्या. दोघांची छायाचित्रेदेखील वर्तमानपत्रात छापली गेली होती. दोघे नाईट क्लबच्याबाहेर, समुद्रकिनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र फिरताना दिसायचे. 

4/6

वर्तमानपत्रातील लेख

1985 साली 'द स्टार' नामक वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका लेखानुसार, रेखा यांच्या आईची या नात्याला पुर्ण अनुमती होती. अगदी त्यांनी ज्योतिषालासूद्धा रेखा आणि इम्रान यांच्या नात्याचे भविष्य विचारले होते. मात्र दोघांनीही कधीच त्यांचे नाते उघडपणे स्वीकारले नाही. रेखा यांनी कधीच या नात्याविषयी काही सांगितले नाही. इम्रान खान यांनी मात्र काहीतरी चालू असल्याचे संकेत दिले होते. 

5/6

इम्रान खान यांचे वक्तव्य

इम्रान खान यांचे एक वक्तव्य फार चर्चेत होते. इम्रान खान यांनी म्हटले होते की, चांगला वेळ मी अभिनेत्रीबरोबर घालवला असला तरी, थोड्या वेळासाठीच त्यांच्याबरोबर मजा केली आणि आता मी त्यातून बाहेर पडलो आहे. एका सिनेमा अभिनेत्रीशी लग्नाची गाठ बांधण्याचा विचारसूद्धा मी करु शकत नाही.

6/6

नंतर केली तीन लग्ने

या वक्तव्यानंतर रेखा आणि इम्रान खान यांचा विषय पुन्हा फार चर्चेत आला नाही. 1995 ला इम्रान यांनी जेमिमा गेल्डस्मिथ हिच्याशी लग्न केले. 10 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. 2015 साली त्याने रेहम खानशी नाते जोडले, मात्र त्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. आता इम्रान यांची पत्नी बुशरा बीबीशी आहे. तिच्याशी  2018 साली त्यांचा विवाह झाला.