PHOTO: कोणते प्राणी त्यांच्या शरीरातील तुटलेले अवयव पुन्हा तयार करू शकतात?

Animal Interesting Facts: जगभरात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. काही प्राण्यांकडे नैसर्गिकपणे वेगळ्या शक्ती असतात. माणसाच्या शरीरातील एखादा भाग तुटला किंवा निकामी झाला तर व्यक्ती अपंग होतो. मात्र काही प्राण्यांच्या बाबतीत असे नसते, ते त्यांच्या शरीरातील तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतात.  तेव्हा अशा प्राण्यांविषयी जाणून घेऊयात. 

| Sep 24, 2024, 17:16 PM IST
1/6

सॅलॅमंडर :

सॅलमंडर्स (Salamander) प्राण्याच्या जगभरात 700 प्रजाती आहेत. या सर्व प्रजातींमध्ये अवयव पुनरुत्पादनाची क्षमता असते. काहीवेळा भक्षकांची शिकार करताना सॅलमंडर्सची शेपटी तुटते. परंतु ही शेपटी काही आठवड्यात पुन्हा वाढू शकते. शेपटीच्या ऐवजी सॅलमंडर्स हृदय, डोळे, पाठीचा मणका इत्यादी काही भाग पुन्हा तयार करू शकतात. 

2/6

स्टारफिश :

 स्टार फिश (Star Fish)हा जलचरांपैकी एक अत्यंत आकर्षक प्राणी आहे. स्टार फिश सुद्धा त्याचे तुटलेले अवयव पुन्हा विकसित करू शकतो. तसेच तुटलेल्या अवयवाच्या एखाद्या भागातून सुद्धा नव्या स्टार फिशची निर्मिती होऊ शकते. 

3/6

ऍक्सोलोटल :

ऍक्सोलोटल (Axolotls) ही सॅलॅमंडरचीच एक प्रजाती असून ही प्रजाती महासागरात आढळते. ऍक्सोलोटलमध्ये अवयवांचे पुनरुत्पादन क्षमता  खूप चांगली असते. ऍक्सोलोटल हृदय, डोळे, पाठीचा मणका, त्वचा, हात पाय इत्यादी शरीराचे अवयव पुन्हा तयार करू शकतात. ऍक्सोलोटल हे जमिनीपेक्षा पाण्यामध्ये जास्त राहतात आणि ते कल्ल्याचा वापर करून श्वास घेतात.   

4/6

आफ्रिकन स्पाईनी माउस :

आफ्रिकन स्पाईनी माउस या प्राण्यात सुद्धा त्याचे अवयव पुनरुत्पादन करण्याची क्षमता असते. हा प्राणी त्याची त्वचा आणि केस पुन्हा निर्माण करू शकतो. 

5/6

प्लॅनेरियन :

प्लॅनेरियन : प्लॅनेरियन हा प्राणी सुद्धा त्याच्या अवयवाच्या छोट्याश्या तुकड्यातुन संपूर्ण नवीन शरीर तयार करू शकतो.  

6/6

सरडा :

 सरडा (Chameleons) त्याच्या त्वचेचा रंग बदलू शकतो. यासह त्याच्याकडे अवयवांचे पुनरुत्पादन करण्याची सुद्धा क्षमता आहे. सरडा त्याचे पाय, त्वचा आणि शेपटी पुन्हा वाढवू शकतो.