'या' दिवशी होणार होतं सलमान- संगीताचं लग्न; पण....

Aug 01, 2019, 08:06 AM IST
1/5

'या' दिवशी होणार होतं सलमान- संगीताचं लग्न; पण....

एकिकडे सेलिब्रिटी विवाहसोहळे म्हटलं की त्यामुळे होणाऱ्या धामधूम, चर्चा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. तर, दुसरीकडे एक विषय कायमच डोकं वर काढतो. तो विषय म्हणजे, हिंदी कलाविश्वात 'दबंग खान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या लग्नाचा. कलाकार आणि चाहत्यांच्या वर्तुळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या सलमानच्या लग्नाविषयी कायमच कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. बरं, असंही नाही की तो लग्नापासून दूर पळत आहे. कारण, काही वर्षांपूर्वी त्याचं लग्नही ठरलं होतं. 

2/5

'या' दिवशी होणार होतं सलमान- संगीताचं लग्न; पण....

सलमानचं लग्न...... बसला ना धक्का? हे खरं आहे. अभिनेत्री आणि एकेकाळची सलमान खानची प्रेयसी संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमानचं लग्न ठरलं होतं. पण, अगदी शेवटच्या टप्प्यावर असतेवेळीच हे लग्न मोडलं आणि त्या दोघांच्या वाटा वेगळ्या झल्या होत्या. 

3/5

'या' दिवशी होणार होतं सलमान- संगीताचं लग्न; पण....

सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाच्या पत्रिकाही छापलेल्या असताना संगीताने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. सलमान आपल्याला फसवत असल्याची बाब सर्वांसमक्ष उघड करत तो एक चांगला पतीच नव्हे, तर एक चांगला प्रियकरही होऊ शकत नसल्याचं म्हणत तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

4/5

'या' दिवशी होणार होतं सलमान- संगीताचं लग्न; पण....

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सलमान आणि संगीताचा विवाहसोहळा २७ मे १९९४ ला पार पडणार होता. किंबहुना खुद्द सलमाननेच लग्नाची ही तारीख ठरवली होती. देसी मार्टीनीच्या वृत्तानुसार '२७ मे रोजी लग्न होणार होतं. कारण, सलमानला त्यासाठी कुटुंबीयांचीही परवानगी होती. पण, माझ्या कुटुंबाच्या पचनी ही बाब उतरत नव्हती, कारण त्यांना माझ्या सुखाची काळजी होती', असं संगीता एका मुलाखतीत म्हणाली होती. 

5/5

'या' दिवशी होणार होतं सलमान- संगीताचं लग्न; पण....

शाहीन जाफरी नावाच्या मुलीला डेट करत असतानाच एका बॉलिवूड पार्टीमध्ये सलमान आणि संगीताची भेट झाली होती. लगेचच त्यांच्या नात्यात टप्प्याटप्प्याने मैत्री आणि प्रेमाचं वळणही आलं. पण, पुढे जाऊन या नात्यात बरेच वाद झाले आणि सलमानने तिला फसवण्याची बाबही उघड झाली होती. सोमी अली या मुलीसाठी तो आपली फसवणूक करत असल्याचंही संगीताने उघड केली होती. एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे लग्नाच्या साधारण महिनाभर आधीपासून संगीता सलमानचा पाठलाग करु लागली होती. त्याच्या अशा वागण्याचा आपल्याला जबर धक्का बसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं. पण, आजच्या घडीला त्यांची मैत्री पाहता या नात्यात कधीकाळी टोकाच्या भूमिकाही घेतल्या गेल्या होत्या याची पुसटशी झलकही दिसत नाही. सध्या सलमान आणि संगीता एकमेकांचे अतिशय चांगले मित्र असून, वेळप्रसंगी एकमेकांच्या कुटुंबासोबतही त्यांना पाहिलं जातं.