दुष्काळी तासगावात पाणी फाउंडेशनचे श्रमदान सार्थकी; सावर्डेचा डोंगर हिरवाईने नटला

Jul 31, 2019, 19:24 PM IST
1/7

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील जलसाठे भरत आहेत. ज्याप्रमाणे राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसाने धबधबे ओसंडून वाहत आहेत, त्याप्रमाणे यावर्षी दुष्काळी सावर्डे गावातही धबधबे वाहू लागले आहेत. 

2/7

उन्हाळ्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून, वॉटर कप स्पर्धेसाठी संपूर्ण गावाने एकजुटीने डोंगरावर जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे पावसाळ्यात डोंगर हिरवाईने नटला असून गावात धबधबे वाहू लागले आहेत.

3/7

तासगाव तालुक्यातील सावर्डे गावच्या डोंगरावरील सौंदती देवालयाजवळील डोंगरावर धबधबा सुरू झाला आहे.

4/7

उन्हाळ्यात वॉटर कप स्पर्धेसाठी संपूर्ण गावाने डोंगरावर जलसंधारणाची कामे केली. ज्या शिकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात पाणी पाहायलादेखील मिळत नव्हते. त्या डोंगरावरुन धो-धो पाणी पडू लागले आहे.

5/7

तासगाव तालुक्यात नेहमीच दुष्काळ. मात्र यंदा गावाने दुष्काळावर मात करत, वरुणराजानेही त्यांच्या प्रामाणिक कष्टाला धो-धो पडून सलाम केला.   

6/7

काही दिवसांपूर्वी ज्या शिकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात जराही पाणी नव्हते तेथे धबधबा सुरू झाला आहे. 

7/7

हा धबधबा पाहण्यासाठी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पर्यटक सावर्डेच्या डोंगरावर येऊ लागले आहेत. गावातील ग्रामस्थांसाठी हा धबधबा म्हणजे एक पर्वणी ठरत आहे.