Whatsapp चॅट पूर्णपणे बदलणार! 'मेटा'चा मेगा प्लॅन; तुम्हाला 'हे' Update दिसतंय का?

Whatsapp New Feature: जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग प्लॅटफॉर्म कात टाकणार आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही यावरुन संवाद साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे. या फिचरची सध्या चचणी सुरु असून बिटा व्हर्जनमध्ये हे फिचर दिसू लागलं आहे. जाणून घेऊयात नेमकं ही फिचर आहे तरी काय...

Swapnil Ghangale | Aug 23, 2024, 09:46 AM IST
1/11

whatsappusernamepin

तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमच्यासाठीही ही बातमी फार महत्त्वाची आहे कारण आता व्हॉट्सअपवरुन चॅट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. नेमकं काय होणार आहे पाहूयात...

2/11

whatsappusernamepin

व्हॉट्सअपच्या नव्या बिटा व्हर्जनमध्ये गुप्ततेसंदर्भात म्हणजेच युझर्स प्रायव्हसीमध्ये सर्वात मोठा बदल केला जाणार आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्पॅमिंग म्हणजेच खोट्या लिंक्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि तत्सम गोष्टी टाळण्यासाठी आता व्हॉट्सअपची पालक कंपनी असलेल्या मेटाकडून अत्यंत महत्त्वाच्या फिचरची चाचपणी सुरु असल्याचे समजते. हे फिचर आहे युझरनेम पीनचं!

3/11

whatsappusernamepin

व्हॉट्सअपच्या अँड्रॉइडसाठीच्या बिटा व्हर्जन 2.24.18.2 मध्ये युझरनेम पीन सेवेची चापणी केली जात आहे. युझर्सची सुरक्षा अधिक वाढवण्याच्या दृष्टीने तसेच नकोसे मेसेज टाळण्यासाठी ही नवीन यंत्रणा लागू केली जाईल असं जीएसएम अरेनाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

4/11

whatsappusernamepin

नव्या अपडेट्सनुसार व्हॉट्सअप युझर्सला त्यांचा चार आकडी पीन नंबर सेट करता येणार आहे. युझरनेमप्रमाणे हा पीन क्रमांक युझर्सच्या आवडीनुसार ठेवता येईल अशी मूभा दिली जाणार आहे.   

5/11

whatsappusernamepin

युझरनेम पीनमुळे युझर्सला अधिक सुरक्षा मिळणार आहे. पूर्वी कधीही व्हॉट्सअपवरुन ज्या व्यक्तींशी संपर्क केला नाही अशा व्यक्तींना आता या पीन सुरक्षेमुळे थेट मेसेज पाठवता येणार नाहीत.  

6/11

whatsappusernamepin

समोरच्या व्यक्तीकडे केवळ तुमचा फोन नंबर असेल तर त्याला थेट मेसेज तुम्हाला करता येणार नाहीत. यामुळे स्मॅमिंगची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि युझर्सला अधिक सुरक्षा मिळेल असा अंदाज आहे.  

7/11

whatsappusernamepin

ज्या अनोखळी व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे त्याला तुमच्या फोन नंबरबरोबरच तुमचा हा युझरनेम पीन ठाऊक असणं आवश्यक असणार आहे. त्याच्याकडे हा पीन असेल तरच त्याला तुम्हाला मेसेज पाठवता येईल.  

8/11

whatsappusernamepin

विशेष म्हणजे एकमेकांकडे फोन नंबर सेव्ह असल्यास आणि पूर्वी एकमेकांशी व्हॉट्सअपवरुन संपर्क केलेल्यांना या पीन नंबरची गरज पडणार नसल्याने या माध्यमातून केवळ नकोश्या व्यक्तींपासून आणि प्रमोशनल मेसेजेसपासून दूर राहता येईल. 

9/11

whatsappusernamepin

"या फिचरमुळे स्पॅमिंगचं प्रमाण फार कमी होईल. मागील अनेक वर्षांपासून व्हॉट्सअपसंदर्भात हा सर्वात चिंतेचा विषय मानला जात होता," असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याचं जीएएसएम अरेनाने म्हटलं आहे.   

10/11

whatsappusernamepin

बिटा व्हर्जनमध्ये या युझरनेम पीन फिचरची चाचणी सुरु असली तरी ते प्रत्यक्षात सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याची कोणतीही वेळ देण्यात आलेली नाही.  

11/11

whatsappusernamepin

मात्र जीएसएम अरेनाच्या अंदाजानुसार, व्हॉट्सअपची कार्यपद्धती पाहिल्यास अजून काही महिने हे फिचर सर्वांना उपलब्ध होण्यासाठी लागेल. वर्षाच्या शेवटपर्यंत हे फिचर उपलब्ध होईल असा एक अंदाज आहे. सध्या या फिचरवर बिटाचे अधिक काम सुरु असल्याचे समजते.