वडील कॉन्स्टेबल, भाऊ उपमुख्यमंत्री अन् 7 सुपर स्टार! चिरंजीवीच्या कुटुंबात कोण कोण?

चिरंजीवीचा जन्म नेमका कुठे झाला? त्यांच कुटुंब इतकं लोकप्रिय का आहे? 

| Aug 23, 2024, 06:58 AM IST

चिरंजीवीचा आज वाढदिवस. चिरंजीवीचं कुटुंब एक लोकप्रिय आणि सेलिब्रिटी कुटुंब आहे. या घरातील सगळीच मंडळी स्टार आहे. पाहा चिरंजीवीची वंशावळ 

1/7

चिरंजीवीच्या कुटुंबात सगळेच सुपरस्टार

साऊथ सुपस्टार चिरंजीवी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. 22 ऑगस्ट 1955 साली जन्मलेले चिरंजीवी यांचं संपूर्ण कुटुंबच सुपरस्टारने भरलेलं आहे. मेगा स्टार म्हणून ओळखले जाणारे चिरंजीवी यांची भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची अशी ओळख आहे. याना आतापर्यंत पद्मभूषण, पद्मविभूषण, IFFI यासारख्या वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. आज चिरंजीवी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची फॅमिली ट्री जाणून घेणार आहोत. या कुटुंबातील अनेक सदस्य हे तामिळ सिनेमातील लोकप्रिय कलाकार आहेत. 

2/7

चिरंजीवींचे वडिल

चिरंजीवी यांचं संपूर्ण नाव कोनिडेला सिवासंकरा वारप्रसाद राव असं आहे. यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955 साली तेलुगु कुंटुंबात झाला.  आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगालथुर येथील कोनिडेला व्यंकटा राव आणि अंजना देवी यांच्या घरी चिरंजीवींचा जन्म झाला. चिरंजीवी यांचे वडिल कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. चिरंजीवी यांचं संपूर्ण बालपण हे गावी आजी-आजोबांसोबत गेलं. 

3/7

चिरंजीवीचं कुटुंब

चिरंजीवी यांचं लग्न सुरेखा कोनिडेलासोबत20 फेब्रुवारी 1980 साली झालं. ज्या तेलुगु कॉमेडियन अभिनेत्री अल्लू रामालिंगा यांची मुलगी आहे. चिरंजीवीला दोन मुली आहेत सुष्मिता आणि श्रीजा अशी त्यांची नावे आहेत. तर मुलाचे नाव रामचरण आहे. जो पॅन इंडिया सुपरस्टार आहे.  

4/7

पवन कल्याण

चिरंजीवी यांना दोन भाऊ आहेत. त्यातील एक म्हणजे पवन कल्याण. कोनिडेला कल्याण बाबूला पवन कल्याण या नावाने ओळखलं जातं. पवन कल्याणचा जन्म 2 सप्टेंबर 1971 रोजी झाला. जनसेवा पार्टी प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पवन कल्याण यांचे तीन लग्न झाले आहेत. नंदिनी, रेणु देसाई आणि ऍना लेझनेवा अशी तिघींची नावे आहेत. 

5/7

नागेंद्र बाबू

नागेंद्र बाबूचं लग्न पद्मजा कोडिनेलासोबत झालं आहे. यांची दोन मुले आहेत. वरुण तेज आणि निहारिका असे यांची नावे आहेत. अभिनेता वरुण तेज देखील अतिशय लोकप्रिय आहे. तर निहारिका ही अभिनेत्री आणि निर्माती म्हणून राम करते. 

6/7

चिरंजीवीच्या दोन बहिणी

विजय दुर्गा आणि माधवी राव असं चिरंजीवीच्या बहिणींची नावे आहेत. साई धरम तेज आणि पंजा वैष्णव तेज अशी विजय दुर्गा यांच्या मुलांची नावे आहेत. 

7/7

चिरंजीवीचा भाचा

चिरंजीवीची पत्नी सुरेखा यांचा भाऊ अल्लू अरविंद यांचा मुलगा म्हणजे अल्लू अर्जून. अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगैया रामचरणचे आजोबा आहेत.