रेल्वेच्या कन्फर्म तिकीटासाठी एजंट कोणती ट्रीक वापरतात का? यामागचं सर्व सत्य जाणून घ्या

 ट्रॅव्हल एजंट्सना कोणता खास कोटा मिळतो का? त्यांना स्पेशल लॉगिन सुविधा मिळते का? ते तिकिट बुकींगसाठी कोणती खास ट्रीक वापरतात का? 

Pravin Dabholkar | Apr 27, 2024, 14:18 PM IST

Confirmed Railway Ticket: ट्रॅव्हल एजंट्सना कोणता खास कोटा मिळतो का? त्यांना स्पेशल लॉगिन सुविधा मिळते का? ते तिकिट बुकींगसाठी कोणती खास ट्रीक वापरतात का? 

1/7

रेल्वेच्या कन्फर्म तिकीटासाठी एजंट कोणती ट्रीक वापरतात का? यामागचं सर्व सत्य जाणून घ्या

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

Confirmed Railway Ticket: सप्टेंबरमध्ये गणपती उत्सव सुरु होईल. त्यामुळे मुंबईतले चाकरमनी मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वेने प्रवास करत आपल्या गावी जातील. मे महिन्यात याच्या तिकिट बुकींगला सुरुवात होईल. पण सुरुवातीलाच तिकीट बुकींग फुल्ल झाल्याचे त्यांच्या लक्षात येईल. त्यानंतर त्यांना वेटींग लिस्ट दाखवली दिसू लागेल. हे आता दरवर्षीच झालं आहे. यावर हजारो तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे गेल्या आहेत. पण कारवाई झालेली मात्र दिसत नाही. 

2/7

कन्फर्म तिकीट कसं मिळतं?

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

या साऱ्याला एजंटगिरी कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो. रेल्वे अॅपवरुन कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवाशांकडे तात्काल तिकीटचा पर्याय असतो. पण तेदेखील इतके सोपे नसते कारण काही मिनिटांतच तिकीट फूल होऊन जाते. यानंतर काही प्रवासी एजंटकडून जास्त किंमतीने कन्फर्म तिकीट विकत घेतात. ट्रेनची इतकी वेटींग असताना एजंट्सना कन्फर्म तिकीट कसं मिळतं? हा प्रश्न तुम्हालादेखील पडला आहे का? 

3/7

स्पेशल लॉगिन सुविधा मिळते का?

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

ट्रॅव्हल एजंट्सना कोणता खास कोटा मिळतो का? त्यांना स्पेशल लॉगिन सुविधा मिळते का? ते तिकिट बुकींगसाठी कोणती खास ट्रीक वापरतात का? सर्वसामान्य प्रवाशांना होणारे हे समज अनेकदा चुकीचे ठरतात.  कारण ट्रॅव्हल एजंट किंवा मध्यस्थी कन्फर्म तिकिटापर्यंत कसे पोहोचतात? जाणून घेऊया. 

4/7

वेगवेगळ्या तारखेच्या तिकीट बुक

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

कन्फर्म सणासुदीच्या 2 ते 3 महिने आधी ट्रॅव्हल एजंट अॅक्टीव्ह होतात. यावेळी एजंट वेगवेगळ्या ट्रेनच्या वेगवेगळ्या तारखेच्या तिकीट बुक करतात. हे तिकिट 15 वर्षे ते 45 वर्षापर्यंतच्या लोकांच्या नावावर बुक केलेलं असतं. कारण सणासुदीला या वयोगटातील प्रवाशांची संख्या जास्त असते. वेगवेगळ्या नावाने याची बुकींग होते. 

5/7

तिकिट एकाच प्रवास दुसऱ्याचा

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

यामुळे एजंट तुम्हाला देत असलेली तिकिट दुसऱ्या कोणाच्यातरी नावाने असते. तुमच्या टीटीई आयडी मागणार नाही, फक्त लिस्ट बघून पुढे जाईल, असे म्हणून एजंट तुम्हाला तिकीट देतात. पण अनेकदा संशय आल्यास टीटीई तुमच्याकडे आयकार्ड मागू शकतो. आयडी आणि प्रिटेंड माहिती मेळ खात नसेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

6/7

तिकिट 2000 रुपयांपर्यंत

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

एका तिकिटासाठी एजंट दुप्पट ते तिप्पट किंमत आकारतात. जे तुमच्या खिशातून जातात. यानंतर टीटीईने पकडले तर फाइन तुम्हाला भरावे लागतो. फाइन भरुन तुम्हाला नवे तिकिट घ्यावे लागेल. यामुळे 400 रुपयांची स्लिपरची तिकिट 2000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. 

7/7

मध्यस्थांकडून तिकिट घेणे टाळा

What trick do agents use for confirmed railway tickets truth behind this

त्यामुळे मध्यस्थांकडून तिकिट घेणे टाळा. तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला तर जनरल किंवा वेटींगचे तिकिट घेऊन प्रवास करा. टीटीईसोबत कन्फर्म तिकिटासंदर्भात बोला. ट्रेनमधील बर्थच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला तिकिट मिळण्याची शक्यता असते. ट्रेनमध्ये कोणती सीट खाली असेल तर टीटीई तुम्हाला त्याचे तिकिट देऊ शकेल.