दुसऱ्या महायुद्धावेळी नेमकं काय घडलं? रहस्य उलगडणार; 64 सैनिकांसह गायब झालेली पाणबुडी 81 वर्षानंतर सापडली

World War II : दुसऱ्या महायुद्धावेळी समुद्रात बुडालेली पाणबुडी 81 वर्षानंतर सापडली आहे. 

Oct 16, 2024, 19:28 PM IST

HMS Trooper : दुसऱ्या महायुद्धात बुडालेली ब्रिटिश पाणबुडी अखेर 81 ​​वर्षांनंतर सापडली आहे. ग्रीक बेटाच्या समुद्रात ही पाणबुडी सापडली आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी नेमकं काय घडलं? याची अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

1/7

सध्या रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) या दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध भविष्यात तिसरे महायुद्ध (Third World War) असू असे भाकित वर्तवले जात आहे. अशातच आता दुसऱ्या महायुद्धावेळी नेमकं काय घडलं? याची रहस्य उलगडणार आहेत. 

2/7

या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी त्यांच्या टीमने यापूर्वी 14 प्रयत्न केले होते.  प्लॅनेट ब्लूने आतापर्यंत युद्धात बुडालेल्या 8 पाणबुड्या शोधल्या आहेत. 

3/7

ग्रीक अंडरवॉटर तज्ज्ञ कोस्टास थॉक्टराइड्स यांच्या टीमला तब्बल 81 वर्षानंतर ही पाणबुडी शोधण्यात यश आले आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी ही पाणबुडी शोधली आहे. प्रथम सोनारच्या साह्याने पाणबुडीचा शोध घेण्यात आला. यानंतर समुद्राच्या खालच्या भागाचा नकाशा बनवून टीम या पाणबुडीपर्यंत पोहचली.  

4/7

17 ऑक्टोबर 1943 रोजी  HMS Trooper ब्रिटिश पाणबुडी एका गुप्त मोहिमेवर निघाली होती. यावेळी ही पाणबुडी रहस्यमयीरित्या गायब झाली होती. जर्मन सैन्याने ही पाणबुडी भूसुरंगाने उद्धवस्त केली होती. 

5/7

 ग्रीसच्या कलामोस बेटाजवळील एजियन समुद्रात 770 फूट खोल समुद्रात HMS Trooper पाणबुडी सापडली आहे. 

6/7

दुसऱ्या महायुद्धावेळी 17 ऑक्टोबर 1943 रोजी समुद्रात बुडालेली  ब्रिटिश पाणबुडी HMS Trooper ही पाणबुडी तब्बल 81 वर्षांनी सापडली आहे. या पाणबुडीत 64 सैनिक प्रवास करत होते.   

7/7

 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. या दुसऱ्या महायुध्दात 5 कोटी पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. सहा वर्ष हे युद्ध सुरु होते. या युद्धाचा रक्तरंजित इतिहास धडकी भडवणारा आहे. याच दुसऱ्या महायुद्धाचे पुरावे नव्याने समोर आले आहेत.