जगात दबदबा निर्माण करणाऱ्या 5 भारतीय उद्योगपतींचे न पाहिलेले फोटो, तुम्ही यापैकी कोणाला ओळखलात?

आपण सर्वांनी मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, कुमार मंगलम बिर्ला या भारतीय करोडपती आणि अब्जाधीश उद्योगपतींबद्दल ऐकले असेलच. हे सर्वजण अशा भारतीयांपैकी आहेत ज्यांनी केवळ आपल्या मूळ गावाचा किंवा राज्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केला आहे. 

Pravin Dabholkar | Oct 17, 2024, 12:37 PM IST

Business Tycoons Young Age Pictures: आपण सर्वांनी मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, कुमार मंगलम बिर्ला या भारतीय करोडपती आणि अब्जाधीश उद्योगपतींबद्दल ऐकले असेलच. हे सर्वजण अशा भारतीयांपैकी आहेत ज्यांनी केवळ आपल्या मूळ गावाचा किंवा राज्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केला आहे. 

1/11

जगात दबदबा निर्माण करणाऱ्या 5 भारतीय उद्योगपतींचे न पाहिलेले फोटो, तुम्ही यापैकी कोणाला ओळखलात?

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

Business Tycoons Young Age Pictures: आपण सर्वांनी मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, कुमार मंगलम बिर्ला या भारतीय करोडपती आणि अब्जाधीश उद्योगपतींबद्दल ऐकले असेलच. हे सर्वजण अशा भारतीयांपैकी आहेत ज्यांनी केवळ आपल्या मूळ गावाचा किंवा राज्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केला आहे.

2/11

आनंद महिंद्रा

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि बिझनेस टायकून आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांचे 9.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ते अनेकदा मजेदार ट्विट शेअर करतात, जे लोकांना खूप आवडते.  

3/11

जुना फोटो ट्विटरवर शेअर

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

उत्कृष्ट कल्पना आणि स्टार्टअप्सबद्दलच्या पोस्टदेखील ते शेअर करत असतात. नोव्हेंबर 2021 मध्ये आनंद महिंद्रा यांनी ते 17 वर्षांचे असतानाचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

4/11

गौतम अदानी

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

फोर्ब्सच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत पुरुषांमध्ये, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत $150 अब्ज संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत आशियाई आहेत. अदानी विमानतळांपासून बंदरांपर्यंत आणि वीजनिर्मितीपासून ते वितरणापर्यंत विविध प्रकारचे व्यवसाय चालवतात.

5/11

विविध प्रकारचे व्यवसाय

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

फोर्ब्सच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत पुरुषांमध्ये, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत $150 अब्ज संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत आशियाई आहेत. अदानी विमानतळांपासून बंदरांपर्यंत आणि वीजनिर्मितीपासून ते वितरणापर्यंत विविध प्रकारचे व्यवसाय चालवतात. अदानीकडे भारतात सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या सहा कंपन्या आहेत. ज्यात अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवर यांचा समावेश आहे. गौतम अदानी यांना त्यांच्या समाजकार्यासाठी, विनम्रपणासाठी कोट्यवधी लोक पसंत करतात.

6/11

कुमार मंगलम बिर्ला

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

कुमार मंगलम बिर्ला, भारतातील एका प्रमुख व्यावसायिक कुटुंबातील चौथ्या पिढीतील कॉर्पोरेट लीडर्स आहेत. भारतातील सर्वात मोठ्या जागतिक समूहांपैकी एक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत. 

7/11

कंपनीची उलाढाल $40 अब्ज पेक्षा जास्त

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

त्यांनी 1995 मध्ये आदित्य बिर्ला समूहाचा ताबा घेतला. त्यावेळी कंपनीची उलाढाल $2 अब्ज होती. दरम्यान कुमार मंगलम यांच्या कठोर परिश्रमाने आणि दृढनिश्चयाने कंपनीची उलाढाल $40 अब्ज पेक्षा जास्त झाली.

8/11

मुकेश अंबानी

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्व्हेसर्व्हा आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2005 मध्ये त्यांना दिवंगत वडिलांच्या साम्राज्यातील तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायांचा वारसा मिळाला. तेव्हापासून ऊर्जा, तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात क्रांती केली आहे.

9/11

पारिवारीक फोटो

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

2016 मध्ये सेवा सुरू करणारे त्यांचे दूरसंचार युनिट आता भारतीय बाजारपेठेतील मुख्य लीडर्स आहेत. चित्रात मुकेश अंबानी त्यांचे वडील दिवंगत धीरूभाई अंबानी आणि भाऊ अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत.

10/11

रतन टाटा

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

रतन टाटा हे भारतीयांच्या आवडत्या उद्योगपतींपैकी एक आहेत. ते या जगात नसले तरी त्यांचा दयाळूपणा, त्यांची नम्रता आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स सदैव स्मरणात राहतील. आपल्या श्रीमंतीचा उपयोग आपण चांगल्या कार्यासाठीदेखील करु शकतो, हे त्यांच्याकडे पाहून शिकता येते.

11/11

नोएल टाटा यांच्या हातात कमांड

Ratan Tata to Anand Mahindra indian business tycoons How looks in younger age

1991 मध्ये जेआरडी टाटा पायउतार झाल्यानंतर, रतन टाटा यांनी टाटा सन्सची सूत्रे हाती घेतली. आता त्यांच्याच कुटुंबाचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या हातात कमांड आहे.