पृथ्वीचं वजन किती आहे? कुणी आणि कसं करतं मोजमाप?

जाणून घेवूया पृथ्वीचे वजन नेमकं किती आहे आणि ते मोजतात कसे?

वनिता कांबळे | Oct 27, 2024, 18:14 PM IST

Weight Of Earth : ब्रम्हांडात अनेक ग्रह अस्तित्वाता आहेत. यापैकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी अस्तित्वात आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली यासह अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. अशातच एणखी एक प्रश्न आहे ज्याच्या उत्तरावरुन संशोधकांमध्ये नेहमीच वाद विवाद होत राहतात ते म्हणजे पृथ्वीचे वजन. जाणून घेवूया पृथ्वीचे वजन नेमकं आहे तरी किती? 

1/7

पृथ्वीवर कोट्यावधी जीव अस्तित्वात आहेत. यासह आकाशाचे टोक गाठणारे उत्तुग पर्वत तसेच अथांग समुद्र किनारे झाडे झुडपे पृथ्वीच्या पृष्ठभागावर अस्तित्वात आहे. पृथ्वीवर वातावरणाचा देखील भार आहे.    

2/7

पृथ्वीचे वजन  13,170,000,000,000,000,000,000,000 पौंड इतके आहे. वजनमध्ये  सांगायचे झाले तर 5.9722x1024 अर्थात 5,974,000,000,000,000,000,000,000 किलोग्रॅम इतके आहे. 

3/7

 पृथ्वीचे वजन कमी जास्त होत आहे. पृथ्वीच्या वातावारणात असणारा हवेचा दाब तसेच पृथ्वीवर असणारे तसेच पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षातून पृथ्वीच्या वातावरणात येणारे वायूकण, धूलीकण यामुळे वजन सातत्याने कमी जास्त होत आहे.   

4/7

पृथ्वीवर अनेक गोष्टी या निसर्गनिर्मित तसेच मानव निर्मीत आहेत.  यामुळे पृथ्वीचे वजन कायम स्थिर राहू शकत नाही.  

5/7

गुरुत्वाकर्षण  बल दोन भिन्न वस्तूंमध्येही  असते. हेच सूत्र वापरून दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती मोजून पृथ्वीचे वजन काढण्यात आले. 

6/7

 संशोधकांनी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या मदतीने पृथ्वीचे वजन केले. यासाठी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांताची मदत घेण्यात आली. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजीचे मेट्रोलॉजिस्ट स्टीफन स्लेमिंगर यांनी याबाबत सांगितले. 

7/7

जीवसृष्टीच्या अस्तित्वामुळेच पृथ्वी सर्वात वेगळी आहे. अशा स्थितीत पृथ्वीचे वजन नेमकं किती आहे यावरुन संशोधकांमध्ये वाद विवाद सुरु आहे.