कोट्यावधींचं घर, आलिशान गाड्या; राजकारणात एन्ट्री करणाऱ्या Thalapathy Vijay ची संपत्ती किती?

Thalapathy Vijay Net Worth: तमिळ सिनेमाचा मेगास्टार थलापथी विजय याने नुकतीच राजकारणात एन्ट्री केली आहे. थलापथीने आपला नवीन राजकीय पक्ष, तमिझगा वेट्रिकझगम (TVK) स्थापन करण्याची घोषणा केली होती.

Saurabh Talekar | Aug 23, 2024, 20:08 PM IST
1/7

थलापथी विजय

आता चेन्नईच्या पायनूर येथील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचा ध्वज लाँच केला अन् राजकारणात एन्ट्री केल्याचं जाहीर केलं. तामिळ चित्रपट उद्योगातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून थलापथीची ओळख आहे. 

2/7

संपत्ती किती?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून थलापथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? थलापथी विजयची एकूण संपत्ती किती आहे? 

3/7

चित्रपटसृष्टीत पदार्पण

तुम्हाला माहिती नसेल तर गेल्या 31 वर्षांपासून थलापती फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

4/7

घराची किंमत

विजय चेन्नईच्या नीलंकराई येथील कॅसुअरिना ड्राइव्ह रस्त्यावर समुद्राजवळ एका आलिशान घरात राहतो. त्याच्या या घराची किंमत घराची किंमत सुमारे 9.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 80 कोटी रुपये आहे. 

5/7

मालमत्ता

तिरुवल्लूर, तिरुपोरूर, तिरुमाझीसाई आणि वंदलूर येथे अनेक त्याच्या मालमत्ता आहेत, ज्यांची एकूण किंमत 12 दशलक्ष डॉलर म्हणजेच 100 कोटी रुपये आहे.

6/7

संपत्ती

नेल्सन दिलीप कुमारच्या 'बीस्ट'साठी अभिनेत्याने 100 कोटी रुपये घेतल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली होती. तर मोठ्य़ा ब्रँडच्या प्रत्येक जाहिरातीसाठी तो 10 कोटी रुपये आकारतो. त्यानुसार त्याची संपत्ती 445 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.  

7/7

कार कलेक्शन

दरम्यान, थलापती विजयच्या कार कलेक्शनमध्ये BMW X5 आणि X6, Audi A8 L, Ford Mustang, Volvo XC90, Mercedes-Benz GLA आणि Land Rover सारख्या महागड्या कारचा समावेश आहे.