स्वत:चाच चित्रपट फ्लॉप होण्यासाठी सलमान करायचा प्रार्थना, कारण ऐकून आश्चर्य वाटेल!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान विषयी अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्व चाहते उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक खास गोष्ट घेऊन आलो आहेत. जाणून घ्या सविस्तर

| Aug 23, 2024, 19:46 PM IST
1/7

चित्रपट हिट होण्यासाठी प्रयत्न

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आपले चित्रपट हिट होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. पण तुम्ही एखाद्या अभिनेत्याला त्याचा चित्रपट फ्लॉप झालेला पाहायचा असतो असे तुम्ही कधी ऐकले आहे का? होय, हा अभिनेता सलमान खान आहे. 

2/7

'बीवी हो तो ऐसी'

आम्ही सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाबद्दल नाही तर सलमान खानच्या 1988 मध्ये प्रदर्शित झालेला 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाबद्दल बोलत आहोत.  

3/7

सलमान खान

सलमान खानने या चित्रपटात रेखा आणि फारुख शेख यांसारख्या कलाकारांसोबत काम केले होते. चित्रपटात सलमानची भूमिका छोटी असली तरी त्याच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले होते. 

4/7

भावाच्या भूमिकेत

या चित्रपटात तो रेखाच्या भावाच्या भूमिकेत दिसला होता. ज्यावेळी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आणि तो प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता. त्यावेळी सलमान खानला तो फ्लॉप हवा होता. 

5/7

चित्रपट फ्लॉप होण्यासाठी प्रार्थना

कारण, सलमान खानला वाटत होते की, त्याने या चित्रपटात चांगलं काम केलं नाही. तो त्याच्या कामावर खूश नव्हता. अशा परिस्थितीत हा चित्रपट फ्लॉप होण्यासाठी कलाकारांनी प्रार्थना सुरु केली. 

6/7

चाहत्यांकडून कौतुक

मात्र, ज्यावेळी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. सलमान खानच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले. 

7/7

पहिलाच चित्रपट

या चित्रपटानंतर अभिनेता सलमान खानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये तो भाग्यश्रीसोबत दिसला होता. हीरो म्हणून सलमानचा हा पहिलाच चित्रपट होता. ज्याने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.