जूनियर एनटीआरचे एका चित्रपटाचे मानधन पाहून बसेल धक्का, वर्षाला कमावतो 'इतके' कोटी

Jr NTR Net Worth: नेटवर्थच्या बाबतीत 'देवरा' अभिनेता जूनियर एनटीआर बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. जूनियर एनटीआरची संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर

| Sep 14, 2024, 13:47 PM IST
1/7

जूनियर एनटीआर

साउथ सुपरस्टार अभिनेता जूनियर एनटीआर सध्या त्याच्या 'देवरा' चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो पहिल्यांदाच जान्हवी कपूर आणि सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

2/7

'देवरा' चित्रपट

जूनियर एनटीआरने 'RRR', 'आदि', 'जय लव कुश' आणि 'जनता गैराज' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. आता तो 'देवरा' चित्रपटातून खळबळ माजवणार आहे. 

3/7

सर्वोत्कृष्ट अभिनेता

जूनियर एनटीआर हा साउथचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. 

4/7

450 कोटींचा मालक

जर जूनियर एनटीआरच्या लक्झरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर तो आज त्याच्या मेहनतीमुळे सुमारे 450 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. 

5/7

महिन्याला 3 कोटी

रिपोर्टनुसार, जूनियर एनटीआर दर महिन्याला सुमारे 3 कोटी रुपये आणि वार्षिक 36 कोटी रुपयांची कमाई करतो. 

6/7

एका चित्रपटाचे मानधन

एका चित्रपटासाठी अभिनेता 60 ते 80 कोटी रुपये इतकी रक्कम घेतो. रिपोर्टनुसार, त्याने 'RRR' चित्रपटासाठी देखील 45 कोटी रुपये घेतले होते. 

7/7

कार कलेक्शन

जूनियर एनटीआरकडे रेंज रोवर वोग, बीएमडब्लयू 720 एलडी अशा अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. तसेच हैदराबादमध्ये त्याचा 25 कोटी रुपयांचा बंगला आहे.