सांताक्लॉज आणि सॉक्सचं नेमकं रिलेशन काय? का लटकवतात 'तो' सॉक्स

Merry Christmas 2023: दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवसासोबतच ख्रिश्चन धर्माचे लोकही हा दिवस प्रभु येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. या सणानिमित्त लोकं त्यांची घरं सुंदर सजवतात. 

Dec 23, 2023, 11:49 AM IST
1/7

यामागे कथा अशी आहे की, एका अत्यंत गरीब माणसाला दोन मुली होत्या. त्या माणसाने आपल्या दोन मुलींना वाढवलं ​​आणि जेव्हा मुली मोठ्या झाल्या. त्यानंतर त्या व्यक्तीला लग्नाची चिंता सतावू लागली. त्या व्यक्तीकडे आपल्या दोन मुलींचे लग्न करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. 

2/7

3/7

यावेळी काही दिवसांनी 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसचा सण आला. त्या दिवशी त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलींनी खऱ्या मनाने प्रभु येशूची प्रार्थना केली आणि त्याच्याकडे मदत मागितली. 

4/7

प्रार्थना केल्यानंतर, त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलींनी ख्रिसमस ट्रीला छान सजवले आणि रात्री झोपण्यासाठी खोलीत गेल्या.

5/7

असं मानलं जातं की, त्या वेळी म्हणजे ख्रिसमसच्या रात्री, सांताक्लॉज गरीब माणसाला मदत केली. संत निकोलसने थंडीच्या रात्री सोन्याने भरलेली पिशवी घरी ठेवली. ही पिशवी घराजवळ ठेवलेल्या सॉकमध्ये पडली.

6/7

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या व्यक्तीला सोन्याने भरलेली पिशवी आढळते तेव्हा तो त्या पैशाने आनंदाने आपल्या मुलींचे लग्न लावून देतो.

7/7

तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली. लोक ख्रिसमसच्या झाडावर सॉक्स सजवतात