छत्रपती संभाजीनगरमध्ये गाजत असलेली ‘शत्रू संपत्ती’ म्हणजे काय?

Enemy Property:  1962 मध्ये चीन आणि 1965 व 1971 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाल्यानंतर भारत सरकारकडून संबंधित देशातील नागरिकांच्या येथील संपत्तीवर ताबा मिळवला होता. सुरक्षा अधिनियमांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. 

| Jan 09, 2024, 16:52 PM IST

Enemy Property: 1962 मध्ये चीन आणि 1965 व 1971 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाल्यानंतर भारत सरकारकडून संबंधित देशातील नागरिकांच्या येथील संपत्तीवर ताबा मिळवला होता. सुरक्षा अधिनियमांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. 

1/8

छत्रपती संभाजीनगरमध्ये गाजत असलेली ‘शत्रू संपत्ती’ म्हणजे काय?

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

Enemy Property: औरंगाबादमधील हत्तेसिंगपुरा (कटकट गेट) परिसरातील 5 एकर 25 गुंठे जागा शत्रू संपत्ती घोषित झाली आहे. 

2/8

खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

अवघ्या 2 दिवसात या मालमत्तेचा व्यवहार झाल्याचा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आला.  ही मालमत्ता परस्पर खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला. 

3/8

सुरक्षा अधिनियमांनुसार कार्यवाही

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

1962 मध्ये चीन आणि 1965 व 1971 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाल्यानंतर भारत सरकारकडून संबंधित देशातील नागरिकांच्या येथील संपत्तीवर ताबा मिळवला होता. सुरक्षा अधिनियमांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. 

4/8

मागे सोडून गेलेली संपत्ती

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

दरम्यान शत्रू संपत्ती म्हणजे काय? हे आधी समजून घेऊ. फाळणी किंवा युद्धानंतर पाकिस्तान आणि चीनमध्ये स्थायिक झालेल्या किंवा  दुसऱ्या देशातील नागरिकत्व घेतलेल्या नागरिकांच्या मागे सोडून गेलेल्या संपत्तीला शत्रू संपत्ती म्हणतात. 

5/8

मूळ कायद्यात दुरुस्ती

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

भारतात 1968 मध्ये शत्रू मालमत्ता कायदा लागू झाला. त्यानंतर 2017 मध्ये या मूळ कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. 

6/8

सरकारला संपत्ती विकण्याचा अधिकार

 What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

कोणताही भारतीय व्यक्ती किंवा संबंधितांचा वारसा या संपत्तीवर आपला हक्क सांगू शकत नाही. सरकारला ही संपत्ती विकण्याचा अधिकार असतो.  यातून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग समाजकल्याणासाठी केला जातो.

7/8

शत्रु संपत्ती विकण्याचा निर्णय

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

औरंगाबादेत एकूण तब्बल 22 एकर 22 गुंठे जागा शत्रू संपत्ती आहे. ‘कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’कडून या संपत्तीचे नियमन केले जाते. हा विभाग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. दरम्यान गेल्यावर्षी केंद्र सरकारने शत्रु संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला. 

8/8

विरोधकांकडून टीका

What is the enemy s wealth prevalent in Chhatrapati Sambhajinagar Marathi News

शत्रु संपत्ती विकून केंद्र सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.