Mumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार 'या' संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर

Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे. 

Saurabh Talekar | Aug 24, 2024, 20:45 PM IST
1/5

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा टी-ट्वेंटी फॉरमॅटचा कॅप्टन सूर्यकुमार यादव टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्याच्या एका कॅचने फायनल सामन्याचं पारडं फिरलं होतं.

2/5

सूर्यकुमारला गुड न्यूज

सूर्यकुमार यादवला याच कॅचचं भलंमोठं बक्षिस मिळालं. हार्दिक पांड्याला डच्चू देऊन सूर्याची कॅप्टन्सीपदी वर्णी लागली होती. अशातच आता सूर्यकुमार यादवला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे.

3/5

कॅप्टन्सीची ऑफर

सूर्यकुमार यादवला एका संघाने थेट कॅप्टन्सीची ऑफर दिल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. त्यामुळे आता सूर्याच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलंय.

4/5

कोलकाता नाईट रायडर्स

सूर्याला ऑफर देणारी टीम मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स आहे. सूर्यकुमार आणि केकेआरचं खास बॉन्ड देखील आहे. सूर्याने आयपीएल डेब्यू केकेआरसाठीच केला होता.

5/5

मुंबई सूर्याला सोडणार?

दरम्यान, मुंबई इंडियन्स सूर्याला सोडण्यासाठी तयार होणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर कॅप्टन्सी देखील धोक्यात असल्याची शक्यता वर्तविती जातीये.