SUV, MUV आणि XUV मध्ये नेमका फरक काय असतो? अनेकदा होतो गोंधळ; सोप्या भाषेत समजून घ्या

SUV Full Form: अनेकदा लोकांना SUV, MUV आणि XUV यामधील फरक कळत नाही. त्यावरुन त्यांचा गोंधळ उडतो. सोप्या भाषेत यामधील फरक आणि अंतर समजून घ्या.   

Jun 14, 2023, 15:10 PM IST
1/7

भारतात SUV गाड्यांची मागणी वाढली असून यामध्ये आता आणखी एक कॅटेगरी प्रसिद्ध होत आहे. या कॅटेगरीला MUV नावाने ओळखलं जातं. याशिवाय महिंद्रा XUV नावानेही कारची विक्री केली जाते. अशा स्थितीत लोकांचा फार गोंधळ होतो. SUV, MUV आणि XUV मध्ये नेमकं काय अंतर असा प्रश्न त्यांना सतावतो. त्यामुळे यामधील नेमका फरक सोप्या भाषेत समजून घ्या.   

2/7

SUV -

What is the difference between SUV MUV XUV

SUV  -  एसयुव्हीचा अर्थ स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल असा आहे. अवघड रस्त्यांसाठी या गाड्या तयार केल्या जातात. यामध्ये ग्राऊंड क्लिअरन्स म्हणजेच रस्ता आणि गाडीच्या खालच्या भागातील अंतरही जास्त असतं. या कॅटेगरीतील प्रसिद्ध गाड्यांबद्दल बोलायचं गेल्यास यात Mahindra Scorpio, Toyota Fortuner आणि Maruti Brezza यांचा समावेश आहे. एसयुव्ही गाड्यांना त्यांचा आकाराप्रमाणेही वेगवेगळ्या श्रेणीत विभागण्यात आलं आहे.   

3/7

What is the difference between SUV MUV XUV

उदाहरणार्थ, मारुती ब्रेझा ही सब-कॉम्पॅक्ट SUV आहे, तर Hyundai Creta ही मध्यम आकाराची SUV आहे आणि Toyota Fortuner ही पूर्ण-आकाराची SUV आहे.  

4/7

MUV

What is the difference between SUV MUV XUV

एमयुव्हीचा अर्थ मल्टि युटिलिटी व्हेईकल असा होतो. अशा गाड्यांमध्ये तुम्हाला जास्त स्पेस मिळतो. या गाड्या आकारात मोठ्या असतात आणि त्यामध्ये जास्त लोक प्रवास करु शकतात.   

5/7

What is the difference between SUV MUV XUV

अनेक गोष्टींमुळे या गाड्यांना मल्टिपर्पज म्हणजे अनेक गोष्टी करु शकणारी गाडी म्हटलं जातं. या कॅटेगरीत मारुती सुझुकी अर्टिगा, महिंद्रा मराजो यांचा समावेश आहे.   

6/7

XUV

What is the difference between SUV MUV XUV

अनेक लोकांचा SUV आणि XUV यावरुन गोंधळ असतो. XUV हे महिंद्राच्या एका गाडीचं नाव आहे.   

7/7

What is the difference between SUV MUV XUV

महिंद्रा या सीरिजमध्ये महिंद्रा एक्सयूवी 300, एक्सयूवी 400 आणि महिंद्रा XUV 700 या 3 गाड्यांची विक्री करतं. या तिन्ही गाड्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल आहेत.