'गाव का छोरा' ते ब्रॅण्ड्समध्ये रमणारा रिंकू... पाहा टीम इंडियाच्या नव्या फिनिशरची Net Worth

Rinku Singh Net Worth : 'मिस्टर फिनिशर' अशी पदवी मिळवलेल्या रिंकू सिंहबद्दल सर्वांनाच माहिती आहे की, या क्रिकेटपटूचा प्रवास अतिशय खडतर सुरु झाला. आज तो जे काही आहे ते त्याच्या मेहनतीचे फळ आहे. आजकाल हा फलंदाज स्वत:वर थोडाही खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. पाहून घ्या रिंकू सिंहचे नेट वर्थ.

| Nov 29, 2023, 13:04 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या बॅटने आग लावणारा रिंकू सिंह आज चर्चेत असला तरीही तो अशा ठिकाणाहून आलाय जिथे बॅट किंवा इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे कधीही पैसे नव्हते. पण आज या फलंदाजाकडे कशाचीही कमतरता नाही आणि त्याने हे सर्व केवळ आपल्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर मिळवले आहे. आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून तो एकीकडे आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या सुखसोयी पुरवतो आणि दुसरीकडे तो स्वतःवर खर्च करतो. हे त्याच्या कपड्यांपासून ते अगदी शूजपर्यंतच्या सगळ्या ब्रँडेड गोष्टींवरुन कळतं. 

(फोटो सौजन्य - Rinku Singh Instagram)

1/6

शूजवरील LV चे लेबल

What is Rinku Singh Net Worth News Indian Team Finisher Cricket News in Marathi

या फोटोत रिंकू अतिशय स्मार्ट दिसणारे काळे स्नीकर्स घालून दिसत आहे. चामड्याने बनवलेल्या शूजच्या सोलवर Vuitton लिहिलेले असते, जे हे कोणत्या ब्रँडचे शूज आहेत ते सांगते. हे लेबल फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस लुई व्हिटॉन आहे, ज्यांच्या अगदी छोट्या गोष्टीची किंमत देखील लाखो आहे. दीपिका पदुकोण त्याची अॅम्बेसेडर आहे.

2/6

जस्टिन बीबरच्या लेबलवरील टी-शर्ट

What is Rinku Singh Net Worth News Indian Team Finisher Cricket News in Marathi

हॉलिवूड गायक जस्टिन बीबरने रायन गुडच्या मदतीने आपले क्लोदिंग लाइन लॉन्च केली. द हाऊस ऑफ ड्रू असे त्याचे नाव आहे. रिंकूने हे टी-शर्ट घातल्याचं दिसतंय. या ब्रँडच्या टी-शर्टची किंमत 8,000 ते 12,000 रुपयांपर्यंत असू शकते.

3/6

प्रत्येक किंमतीचे शूज वॉर्डरोबमध्ये

What is Rinku Singh Net Worth News Indian Team Finisher Cricket News in Marathi

रिंकूकडे महागडे शूज तर आहेतच पण त्याच्याकडे अगदी सगळ्या ब्रँडचे आणि किंमतीते  स्पोर्ट्स शूज देखील आहेत. या फोटोत दिसणारा फेंडी ब्रँड. हे जगातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी लेबलांपैकी एक आहे आणि त्याची किंमत अगदी लाखोंच्या घरात आहे.

4/6

बालमेन टी-शर्ट

What is Rinku Singh Net Worth News Indian Team Finisher Cricket News in Marathi

बालमेन हे फ्रेंच लक्झरी घर आहे, ज्याची स्थापना 1914 मध्ये झाली. अगदी सामान्य दिसणार्‍या टी-शर्टची किंमत $600 किंवा त्याहून अधिक असू शकते. भारतीय चलनात ही किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.

5/6

महागड्या वस्तूंपासून ते अगदी कमी किंमतीपर्यंत

What is Rinku Singh Net Worth News Indian Team Finisher Cricket News in Marathi

रिंकूकडे सगळेच महागडेच नाही तर तिच्याकडे पॉकेट फ्रेंडली पर्यायही आहेत. उदाहरणार्थ, या चित्रात दिसत असलेल्या हुडीची किंमत इंटरनेटनुसार सुमारे 15,000 रुपये आहे, तर दुसऱ्या बाजूला दिसलेल्या टी-शर्टची किंमत सुमारे 1,400 रुपये आहे.

6/6

रिंकूची खास स्टाइल

What is Rinku Singh Net Worth News Indian Team Finisher Cricket News in Marathi

रिंकू सिंहने स्वस्त कपडे घालावेत किंवा अगदी ब्रँडेड.. पण त्याची क्लोदिंग स्टाइल आणि चॉइस दोन्ही हटके आहे. अनेकदा त्याच्या फोटोतून याची कल्पना होते.