'अक्षय कुमारला छातीवरचे केस ट्रीम करण्यास सांगितले तेव्हा..'; Switzerland मधील प्रकार

Akshay Kumar Chest Hair: एक काळ असा होता जेव्हा अनेक अभिनेते बेअर चेस्ट म्हणजेच उघड्या छातीने अनेक सीन द्यायचे. व्हॅक्स करणं वगैरेसारखे प्रकार आताआता अभिनेतेही करु लागले आहेत. मात्र पूर्वीचा काळ तसा नव्हता. याबद्दलच अक्षय कुमारसंदर्भातील एक रंजक किस्सा नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध डिझायनरने सांगितला. नेमकं काय घडलेलं पाहूयात...

Swapnil Ghangale | Aug 24, 2024, 13:21 PM IST
1/9

akshaykumarhhesthair

एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगताना सदर सल्ल्यानंतर नक्की काय घडलं याबद्दलही भाष्य करण्यात आलं आहे. नक्की घडलेलं काय जाणून घ्या...

2/9

akshaykumarhhesthair

बॉलिवूड अभिनेत्यांचा सध्याचे लूक हे चांगलेच चर्चेत असतात. मात्र पूर्वी असं नव्हतं. पूर्वी अभिनेते आपल्या लूक्सकडे फारसे लक्ष देत नसायचे. त्यामुळे छातीवरील केस असतानाही बेअर चेस्ट म्हणजेच छाती दाखवत अनेक सीन अभिनेते द्यायचे. यामध्ये अनिल कपूर, अक्षय कुमार, सनी देओल, सुनिल शेट्टी आणि संजय दत्त यासारख्या अभिनेत्यांचे या अशा केसाळ लूकची चांगलीच चर्चा राहिली. 

3/9

akshaykumarhhesthair

डायरेक्टर अनुराग कश्यपने एका समान खानने 'तेरे नाम' चित्रपटासाठी छातीवर केस वाढवले होते असं बोलल्याने अडचणीत आला होता. आता प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने अक्षय कुमारसंदर्भातील एक किस्सा सांगितला आहे. 

4/9

akshaykumarhhesthair

अक्षय कुमारला छातीवरील केसांसंदर्भात मी दिलेला एक सल्ला दिल्याचा किस्सा डिझायनर मनिष मल्होत्राने म्हटलं आहे.

5/9

akshaykumarhhesthair

'वी आर युवा' नावाच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये, त्या काळात अभिनेत्री त्यांना स्क्रीनवर कोणते कपडे परिधान करायचे आहेत याबद्दल जागृक होत्या. मात्र पुरुष म्हणजेच अभिनेते याबद्दल फारसा विचार करायचे नाहीत असं मनिष मल्होत्रा म्हणाला.

6/9

akshaykumarhhesthair

"मला आठवतंय की आम्ही स्वित्झर्लंडमध्ये होतो. आम्ही 'धडकन' चित्रपटामधील गाण्याचं चित्रिकरण करत होतो. मी त्यावेळेस अक्षय कुमारला छातीवरील केस ट्रीम कसं असं सांगितलं," असं मनीष मल्होत्रा म्हणाला.

7/9

akshaykumarhhesthair

अक्षय कुमारला हा सल्ला काय दिला होता याबद्दलही या प्रसिद्ध डिझायनरने स्पष्टीकरण दिलं. "तू (शूटदरम्यान) पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान करणार आहेस म्हणून हे सुचवतोय, असं मी म्हटलं. माझा सल्ला ऐकून त्याला धक्काच बसला, कारण त्याला असं काही अपेक्षित नव्हतं," असं मनिष मल्होत्रा म्हणाला.  

8/9

akshaykumarhhesthair

"हा सारा प्रकार 'दिल ने ये कहा है दिल से' गाण्याच्या शुटींगदरम्यानचा होता. चित्रपटाचा दिग्दर्शक धर्मेश दर्शन फार पाठिंबा देणारा होता. त्याने माझ्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवत अक्षय कुमारला, 'होय, हा सल्ला योग्य आहे' असं म्हणाला होता," असं मनिष मल्होत्रा म्हणाला.

9/9

akshaykumarhhesthair

अक्षय कुमारला दिलेल्या या सल्ल्याचा त्यांच्या नात्यावर कसा परिणाम झाला याबद्दल मनिष मल्होत्राने सविस्तर माहिती दिली नाही.