Chanakya Niti: दिवसा झोपल्याने काय होतं? आचार्य चाणक्य यांनी सांगितले दुष्परिणाम

आचार्य चाणक्य यांच्या शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये चाणक्य यांनी दिवसा झोपल्याने इतरही नुकसान होऊ शकते. 

Soneshwar Patil | Aug 24, 2024, 13:21 PM IST
1/6

प्राणघातक

आचार्य चाणक्य म्हणतात जागृत होण्याच्या तुलनेत झोपेत असताना श्वासोच्छास जलद होतो आणि प्रत्येक व्यक्तीचा श्वासोच्छास स्थिर असतो. म्हणूनच दिवसा झोपणे हे प्राणघातक आहे. 

2/6

आरोग्य समस्या

दिवसा झोपल्याने शरीराचे नैसर्गिक ऊर्जा चक्र आणि दिनचर्या विस्कळीत होते. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. 

3/6

दु:ख

चाणक्य यांच्या मते, दिवसा झोपल्याने व्यक्ती विनाकारण उदासीनतेचा शिकार बनू शकते. 

4/6

आळस

तसेच आळस आणि थकवा वाढू शकतो. ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या जीवनातील ध्येय पूर्ण करू शकत नाही. 

5/6

उज्ज्वल भविष्य

चाणक्य म्हणतात की दिवसा झोपल्याने व्यक्ती सामाजिक जीवनापासून दूर राहतो. जी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी घातक असते. 

6/6

कोणी झोपावे

आचार्य चाणक्य यांच्या मते, दिवसा फक्त लहान मुले आणि आजारी लोकांनीच झोपावे.  इतर व्यक्तींनी फक्त रात्रीच झोपले पाहिजे.