AC बद्दल बोलताना वापरलं जाणारं Ton म्हणजे काय? वजनाशी काही संबंध नाही पण...

What Is Ton Means In AC: भारतातील अनेक राज्यांमध्ये आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होणारं इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे एसी. अनेकजण उन्हाळा सुरु होण्याआधीच एसी खरेदी करतात किंवा त्यासंदर्भातील सर्च सुरु करतात. मात्र एसी घेताना किंवा त्याचा विचार करताना 'टन' हा शब्द अनेकदा कानावर पडतो. मात्र टन म्हणजे नेमकं काय? एसीची क्षमता टनमध्ये का मोजतात याबद्दल अनेकांना ठाऊक नसतं याचबद्दल जाणून घेऊयात...

Feb 24, 2023, 16:02 PM IST
1/6

What Is Ton Means In AC

तुम्ही विचार करत असाल की एसीची क्षमता मोजतात त्या टनचा वजनाशी काही संबंध असेल तर हा समज अगदी चुकीचा आहे. पण मग या 'टन'चा नेमका अर्थ काय? हा अर्थ एसी घेताना समजून घेणं महत्तवाचं का असतं? यावर टाकलेली नजर...

2/6

What Is Ton Means In AC

एसीच्या बाबतीत टन हे असं एकक आहे ज्याच्या मदतीने ज्या रुममध्ये एसी वापरला जाणार आहे त्याचा आकार आणि एसीच्या फिचर्सची सांगड घातली जाते.

3/6

What Is Ton Means In AC

एखादा एसी अमुक एका आकाराच्या रुममध्ये किती प्रभावी ठरु शकतो, त्या रुममध्ये एसीची कुलिंग कॅपेसिटी किती आहे हे मोजण्यासाठी या एककाचा वापर केला जातो. आता टन मोजण्यासाठी कुलिंग कॅपेसिटी कशी मोजतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

4/6

What Is Ton Means In AC

टनचं गणित हे ब्रिटीश थर्मल युनिट्स पर अवरच्या सुत्रावर आधारित असतं. याला सामान्यपणे बीटीयू/एचआर अशा स्वरुपात दर्शवला जातं. एअर कंडिशनरसाठी बीटीयू रेंज 5000 बीटीयू ते 24000 बीटीयूपर्यंत असते. 12000 बीटीयू म्हणजे 1 टन असं हे समिकरण आहे.

5/6

What Is Ton Means In AC

बीटीयू ही एसीची क्षमता मोजण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त मानांकन पद्धत आहे. एखाद्या खोलीमधील प्रत्येक वर्ग फूटसाठी सामान्यपणे 20 बीटीयू/एचआर ची आवश्यकता असते. याच अर्थ असा की बीटीयू/एचआर ची संख्या जितकी अधिक तितका एसीचा प्रभाव अधिक असतो.

6/6

What Is Ton Means In AC

अर्थात याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेस जास्त बीटीयू/एचआर असणाऱ्या एसीचाच विचार केला पाहिजे. कारण अंतिम निर्णय हा ज्या रुममध्ये एसी वापरायचा आहे त्याचा आकार किती आहे यावर अवलंबून असतो. तसं नसेल तर एसीची फारसा उपयोग होणार नाही.