चुकीच्या सवयींमुळे वाढलं वजन? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् करा Weight Loss

हल्लीच्या धावपळीच्या जीवणात लोकांच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने लोकांना खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे. यामुळे निर्माण झालेली दुसरी समस्या म्हणजे वाढलेलं वजन. 

Mar 25, 2023, 18:38 PM IST

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या उपाययोजना करत असतो. यासाठी विशेष आहाराकडे आपण जास्त लक्ष देतो. पण उन्हाळ्याच्या हंगामात तुम्ही जास्त पिऊन किंवा फळे आणि भाज्या खाऊन यासोबत व्यायाम करुन तुम्ही वजन कमी करु शकता.

1/6

Weight Loss

आजकाल अनेकांना चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे वजन सहजपणे कमी करू शकता.

2/6

swimming

पोहणे - उन्हाळ्यात गरम होत असताना पोहणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. त्यामुळे तुमची आवड जपत वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्विमिंग करू शकता. पोहण्याने संपूर्ण शरीराला व्यायाम होते आणि लवकर वजन कमी होते.

3/6

dance

नृत्य - तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर डान्स हा चांगला पर्याय आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही डान्स क्लासेसमध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुमचे वजनही कमी होईल. 

4/6

Zumba

Zumba - सध्या वजन कमी करण्यासाठी झुंबा करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या प्रकारामध्ये तुम्ही फास्ट म्युझिकसह व्यायाम करता ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5/6

running

चालणे किंवा धावणे - जर तुम्हाला जास्त व्यायाम करायचा नसेल तर उन्हाळ्यात चालून किंवा धावूनही तुम्ही वजन कमी करु शकता. चालण्याने किंवा धावल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि संपूर्ण शरीराचे वजन कमी होते.

6/6

food

योग्य आहार - उन्हाळ्यात येणारी फळे आणि भाज्यांमधून तुम्हाला योग्य पोषण मिळू शकते. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहू शकेल. उन्हाळ्यात काकडी, काकडी, टरबूज, खरबूज इत्यादी खाऊन वजन कमी करू शकता.