Ind vs Afg: टी-20 सिरीजसाठी टीमची घोषणा, ‘या’ घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या t20 स्कॉडची यादी जाहीर केली आहे. या मालिकेत एकूण 19 खेळाडूंना संधी मिळाली.   

Jan 07, 2024, 13:03 PM IST

 

 

1/7

India vs Afghanistan T20I squad  : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून T20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळले जाणार असून या मालिकेतील अफगाणिस्तान टीमने पाच दिवस आधीच आपला संघ जाहिर केला.  

2/7

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाचे इब्राहिम झद्रान अफगाण नेतृत्व करणार आहे. याशिवाय जगातील सर्वात धोकादायक टी-20 गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा गोलंदाज संघात परतला आहे. मात्र टीम इंडियाने अद्याप आपला संघ जाहीर केला नाही.     

3/7

अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान अनुभवी आणि जगातील सर्वात धोकादायक T20 गोलंदाजांपैकी एक मानला जातो. 11 जानेवारीपासून मोहाली येथे भारताविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. 

4/7

राशिद खानने या फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानसाठी 82 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 130 विकेट आहेत. त्याने अपल्या खेळामुळे कित्येक खेळाडूंच्या मनात आपली छाप सोडली आहे.  

5/7

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकात  स्पष्टीकरण देत म्हटलं की, 'संघात असूनही टी-20 सीरीजसाठी रशीद मैदानात उतरण्याची शक्यता नाही. कारण नुकत्याच झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेतून तो बरा होत आहे. यूएईविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान संघाबाहेर असलेला मुजीब उर रहमान संघात परतला आहे.

6/7

यूएईविरुद्धच्या सामन्यातील राखीव संघाचा भाग असलेल्या इकराम अलीखिलचा बॅकअप यष्टिरक्षक फलंदाज म्हणून मुख्य संघात समावेश करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं.  

7/7

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मीरवाईज अश्रफ म्हणाले, 'भारताला भेट देताना आम्हाला आनंद होत आहे. भारत हा जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे आणि T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत अफगाणिस्तानला  टीम इंडिया विरुद्ध खेळताना पाहणे मनोरंजक ठरेल.'