आदित्य-शिवानी एकमेकांच्या प्रेमात?

मराठी सिनेसृष्टीतील नवी जोडी चर्चेत 

| Jan 26, 2021, 13:30 PM IST

मुंबई : नुकतच मराठी विश्वातील क्यूट कपल म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar)  यांच नुकतंच लग्न झालं. या लग्नाने सगळ्यांच लक्ष तर वेधलंच. पण यासोबत आणखी एका जोडीची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. ही जोडी आहे अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळी (Shivani Rangole) . 

1/14

सिद्धार्थ - मितालीच्या लग्नात हे दोघं एकत्रच होतं.

2/14

एवढंच नव्हे तर या दोघांनी कपड्यांच्या बाबतीत ट्युनिंग केलं होतं. विराजसच्या कुर्त्याचं आणि शिवानीच्या ब्लाऊज खास ट्युनिंग यावेळी पाहायला मिळालं. 

3/14

तसेच या दोघांनी आपापल्या इंस्टाग्रामवर एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. 

4/14

गेल्या काही दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता या फोटोंवरून हे स्पष्ट झालं आहे. 

5/14

१५ फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने Yup असं कॅप्शन देत विराजस सोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने हार्ट इमोजीदेखील टाकली होती. तेव्हापासून ही जोडी रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

6/14

या दोघांची पहिली भेट ही एका नाटकानिमित्त झाली होती. ‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केलं होतं.

7/14

विराजस आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' मध्ये आदित्यच्या भुमिकेत आहे. 

8/14

विराजसचं मालिकेत सईवर प्रेम असून मेघनासोबत लग्न ठरलं आहे. 

9/14

विराजस सध्या रिल आणि रिअल लाईफमध्ये प्रेमात असल्याचं दिसतंय.

10/14

विराजसला लहानपणापासून कलेचा वारसा लाभला आहे. आजोबा जयराम कुलकर्णी, वडिल रुचिर कुलकर्णी आणि आई मृणाल कुलकर्णी 

11/14

विराजस लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 

12/14

13/14

14/14