Vegetable : या भाज्या देतात रोगांना निमंत्रण ! खाल्ल्याने 'हे' होऊ शकते नुकसान

Vegetable Side Effects: भाज्यांचा प्रामुख्याने आपल्या रोजच्या आहारात समावेश केला जातो. पोषक तत्वांनी युक्त भाज्या  (Vegetables) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या खल्ल्याने त्याचा खूप आरोग्याला लाभ होतो. मात्र, असा काही भाज्या आहेत की त्या रोगांना निमंत्रण देतात. त्यामुळे या भाज्या खाण्याचे शक्यतो टाळा. 

| Jan 21, 2023, 15:34 PM IST
1/5

कोबीमध्ये बारीक किडे (Tapeworm) असतात. त्यांना पाहणे शक्य नसते. हे फीताकृमी रक्ताद्वारे मेंदूपर्यंतही पोहोचतात. फीताकृमीसह फुलकोबी खाल्ल्याने मेंदू, स्नायू आणि यकृताला इजा होऊन गंभीर आजार होऊ शकतात.

2/5

अळूची पाने भाजी म्हणूनही खातात. या पानांमध्ये कीटक असण्याचा जास्त धोका आहे. अशी अलूची भाजी खाणे आरोग्याला जड जाऊ शकते. 

3/5

अनेक लोक वांग्याचा भरता आणि भाजी बनवून मस्त चवीने खातात. वांग्याच्या बियांमध्ये किडे असू शकतात. अशी वांगी खाल्ल्याने मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात. नीट शिजवल्यास अळी मरते.

4/5

पडवळमध्ये लहान किडे देखील असतात. रोग टाळायचे असतील तर पडवळाच्या बिया वेगळ्या करुन त्याची भाजी करावी. बियांच्या आत जंत किंवा बारीक किडे असू शकतात. 

5/5

भाज्यांव्यतिरिक्त, शिमला मिरचीचा वापर नूडल्स, चायनीज आणि शेजवण राईस यांसारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यात असलेले लहान किडे आणि अळ्या सोडू शकतात आणि मेंदूच्या आजाराचे कारण बनू शकतात.