दूधविक्रेत्याला 32 वर्षांनी कोर्टाने सुनावली शिक्षा; प्रकरण आणि शिक्षा वाचून बसेल धक्का

Adulterated Milk: उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमधून एक अशी बातमी समोर आली आहे जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. येथील एका दूधविक्रेत्याला 32 वर्षांपूर्वी केलेल्या एका घोटाळ्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे. दूधविक्रेत्याविरोधात भेसळयुक्त दूध विकल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 32 वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्यामध्ये शिक्षाही सुनावण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण आणि काय शिक्षा सुनावण्यात आलीय जाणून घेऊयात...

Jan 21, 2023, 15:00 PM IST
1/5

muzaffarnagar 32 years after complaint man sentenced to six months in jail for selling adulterated milk

या प्रकरणामध्ये अखेर 19 जानेवारी 2023 रोजी शिक्षा सुनावली. न्यायालयाने तब्बल 32 वर्षानंतर निकाल देताना आरोपीला दोषी ठरवत सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

2/5

muzaffarnagar 32 years after complaint man sentenced to six months in jail for selling adulterated milk

खाद्य निरीक्षक सुरेश चंद यांनी या प्रकरणामध्ये 21 एप्रिल 1990 रोजी या दूधविक्रेत्याविरोधात न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणावर मागील 32 वर्षांपासून सुनावणी सुरु होती. वेळेवेळी प्रकरण पुढे ढकललं जात होतं.

3/5

muzaffarnagar 32 years after complaint man sentenced to six months in jail for selling adulterated milk

या प्रकरणातील सरकारी अधिकारी रामावतार सिंह यांनी शुक्रवारी पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार दूधविक्रेता हरबीर सिंहला भेसळयुक्त दूध विकताना रंगेहाथ पकडलं. या दूधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. या तपासणीमध्ये दूध भेसळयुक्त असल्याचं स्पष्ट झालं.

4/5

muzaffarnagar 32 years after complaint man sentenced to six months in jail for selling adulterated milk

अप्पर मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुमार यांनी गुरुवारी दूधविक्रेता हरबीर सिंहला या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. या व्यक्तीला आर्थिक दंड ठोठावण्याबरोबरच तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली आहे.

5/5

muzaffarnagar 32 years after complaint man sentenced to six months in jail for selling adulterated milk

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर (muzaffarnagar) जिल्ह्यातील कोर्टात भेसळयुक्त दूध विकल्या प्रकरणातील सुनावणी झाली. मागील 32 वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणामध्ये अखेर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.