मुंबईकरांनो Valentine's Day साठी 'या' ठिकाणी जाताय तर थांबा... अन् लगेच बदला प्लॅन
Feb 12, 2023, 14:03 PM IST
1/5
मुंबईची ओळख असलेल्या क्वीन नेकलेस अर्था मरीन ड्राईव्हला मुंबईकरांसह विदेशी पर्यटकांचीही मोठी पसंती मिळते. तसेच सकाळ आणि संध्याकाळ या वेळात अनेक जण व्यायामासाठी येत असतात. त्यामुळे तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा की योगा डे याचा विचार करुन तिथे जा.
2/5
इतर दिवशी अनेक जोडपी एकांत मिळवण्यासाठी मरीन ड्राईव्हच्या कठड्यांचा आधार घेत असतात. पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इथे नवख्यांसोबत दुसऱ्याही प्रेमी युगुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला शांतता हवी असेल तर या ठिकाणी कधीही जाऊ नका.
TRENDING NOW
photos
3/5
जुहू बीच हा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी जुहू बीचवर कायमच गर्दी दिसून येते. त्यातच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुहू बीचवर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जाणे टाळा.
4/5
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटेंचे बंगले असलेल्या वांद्रे बँडस्टँडलाही अनेक जण पसंती देतात. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आपलं प्रेम व्यक्त करण्याची अनेकांच्या मनात इच्छा होऊ शकते. त्यामुळे इथेही जाण्याआधी विचार करा. सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्लॅन फ्लॉप ठरण्याची शक्यता आहे.
5/5
वांद्रा वरळी सी लिंकच्या सुरुवातीला असणारा वांद्रा रेक्लेमेशन रोडलाही प्रेमी युगुल पसंती देतात. इथेही मोठ्या प्रमाणात आपणी खासगी क्षण घालवतात. त्यामुळे व्हॅलेंटाईल डेसाठी इथेही गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथेही जाताना विचार करा.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.