PHOTO: रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी पूजा अशी बनली IPS, जर्मनीची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC

IPS Pooja Yadav Success Story: आयपीएस पूजा यादव यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. त्यांनी सुरुवातीच्या काळात रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. पार्ट टाईम नोकरी केली. पण आपले IPS होण्याचे स्वप्न कधीही मरू दिले नाही. 

Pravin Dabholkar | Jun 14, 2024, 15:53 PM IST
1/10

रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी पूजा अशी बनली IPS, जर्मनीची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC

UPSC Success Story IPS Pooja Yadav Biography Inspirational Marathi News

IPS Success Story: एखादी गोष्ट करायची मनापासून इच्छा असेल तर समोर परिस्थिती कोणतीही असो, माणूस आपले स्वप्न सोडत नाही. तो सतत आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत असतो. 

2/10

IPS होण्याचे स्वप्न

अशीच कथा एका मुलीची आहे. जिला IPS बनायचं होतं. पण आर्थिक पाठबळ नव्हतं. तिने पैसे मिळवण्यासाठी मुलांचे  शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली. रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. पार्ट टाईम नोकरी केली. पण आपले IPS होण्याचे स्वप्न कधीही मरू दिले नाही. आयपीएस पूजा यादव यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. 

3/10

चांगल्या पगाराची नोकरी सोडली

पूजा यादव यांनी जर्मनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. 2018 मध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

4/10

हरियाणामध्ये शिक्षण

आयपीएस पूजा यादव यांचा जन्म 20 सप्टेंबर 1988 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी आपले शिक्षणही तेथेच पूर्ण केले. 

5/10

जर्मनी आणि कॅनडामध्येही नोकरी

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केले. यानंतर काही काळ त्यांनी जर्मनी आणि कॅनडामध्येही नोकरी केली. पण आपण भारताऐवजी दुसऱ्या देशाच्या विकासात योगदान देत आहोत, याची पूजा यांना जाणिव होऊ लागली. 

6/10

अथक मेहनत

पूजा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जोरदार तयारी केली. अथक मेहनत घेतली. दिवसरात्र एक केला आणि आपले स्वप्न पूर्ण केले. 

7/10

यूपीएससी परीक्षेत 174 वा क्रमांक

पूजा यादवने 2018 ची नागरी सेवा परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. तिला या परीक्षेत ऑल इंडिया रँकींग 174 मिळाला. आता त्या गुजरात केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 

8/10

कुटुंबीयांचा नेहमीच पाठिंबा

यूपीएससीची तयारी करत असताना किंवा MTech चे शिक्षण घेत असताना पूजा यादव यांना कुटुंबीयांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पूजा यांनी सुरुवातीच्या काळात रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. शिक्षणाचा खर्च निघावा यासाठी विद्यार्थ्यांना शिकवणी दिली. 

9/10

विकास भारद्वाज यांच्याशी लग्न

18 फेब्रुवारी 2021 रोजी आयपीएस अधिकारी पूजा यांनी आयएएस विकास भारद्वाज यांच्याशी लग्न केले. दोघेही मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पहिल्यांदा भेटले होते. 

10/10

सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय

पूजा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे 324k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. लोकांशी संपर्कात राहण्यासाठी आणि आयडीया शेअर करण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी व्यासपीठ असल्याचे पूजा सांगतात.