Unlock 5 : 'या' नियमांमध्ये होणार बदल

१ ऑक्टोबरपासून देशात अनलॉक ५ची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

Sep 29, 2020, 13:19 PM IST

 देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशात येत्या १ ऑक्टोबरपासून अनलॉक ५ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अनलॉक ४ अंतर्गत देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक नियम शिथिल केले होते. आता देखील अनलॉक ५अंतर्गत अनेक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. 

1/7

केंद्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाने पदार्थांवर एक्सपायरी डेट टाकणं बंधनकारक केलं आहे. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट समोर उभे आहे. त्यामुळे अन्न पुरवठा विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

2/7

१ ऑक्टोबरपासून टीव्ही खरेदी करणे देखील महाग होईल.मीडिया रिपोर्टनुसार टीव्हीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या ओपन सेलच्या आयातीवर ५ टक्के सीमा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने एक वर्षाची सूट दिली होती. ही सूट ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे.

3/7

पंतप्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन विनामूल्य घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२० रोजी समाप्त होत आहे. कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने या योजनेचा कालावधी सप्टेंबर पर्यंत वाढविला होता.

4/7

दर महिन्याच्या सुरूवातीस, सरकारी कंपन्या एलपीजी आणि नैसर्गिक गॅसच्या किंमती निश्चित करतात.  सप्टेंबरमध्ये १४.२ किलो आणि १९ किलो गॅस सिलेंडर्सच्या किंमती कमी करण्यात आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबरमध्येही एलपीजीच्या किंमती खाली येण्याची शक्यता आहे.

5/7

ड्रायव्हिंग करताना आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी ठेवण्याचा तणाव संपुष्टात येणार आहे. ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे.

6/7

तुम्ही विदेशात शिकताय किंवा तुमच्या मुलाला पैसै पाठवताय किंवा विदेशातील तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करताय तर तुम्हाला ५ टक्के अधिक टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (TCT) भरावा लागणार आहे. रिझर्व बॅंकेच्या लिबरलाइज रेमिटेंस स्किम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींना टीसीएस द्यावे लागणार आहे.  

7/7

गाडी चालवताना रुट नेविगेशनसाठी मोबाईलचा वापर होतो. पण हा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की गाडी चालवताना कोणता अडथळा येऊ नये.  अन्यथा १ हजार ते ५ हजारपर्यंत दंड होऊ शकतो. रस्ते परिवहन मंडळाने यासंदर्भात माहिती दिली.