सलमान, प्रभाससोबत झळकलेल्या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केले 45 कोटींचे घर

बॉलिवूड अभिनेत्रीचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तिच्या या घराची किंमत तब्बल 45 कोटी रुपये आहे.

Apr 13, 2024, 21:56 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तिच्या या घराची किंमत तब्बल 45 कोटी रुपये आहे.

1/9

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

2/9

सलमान खान, ऋतिक रोशन, प्रभाससोबत झळकलेल्या अभिनेत्रीने खरेदी केले मुंबईत घर

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

मुंबईत आपले हक्काचे घर असावे, तिथून समुद्राचा सुंदर दृश्य पाहता यावे, अशी अनेकांची इच्छा असते. आता एका बॉलिवूड अभिनेत्रीची ही इच्छा पूर्ण झाली आहे. सलमान खान, ऋतिक रोशन, प्रभाससोबत झळकलेल्या अभिनेत्रीने मुंबईत घर खरेदी केले आहे

3/9

पूजा हेगडे सतत चर्चेत

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून जगभरात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून पूजा हेगडेला ओळखले जाते. ती कायमच चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.   

4/9

प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री पूजा हेडगेनं ऋतिक रोशनसह ‘मोहनजोदडो’ चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पूजा हेगडेने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

5/9

मुंबईत खरेदी केले अलिशान घर

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

पूजा हेगडे ही वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. पूजा हेगडेने मुंबईत अलिशान घर खरेदी केले आहे.

6/9

वांद्रे परिसरात आहे नवीन घर

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा हेगडेचे नवीन घर मुंबईतील वांद्रे परिसरात आहे. विशेष म्हणजे तिच्या आलिशान घरातून समुद्र दिसतो. 

7/9

लवकरच होणार शिफ्ट

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

पूजा हेगडेचे नवीन घर 4 हजार स्क्वेअर फूट इतके मोठे आहे. ती लवकरच या घरात राहायला जाणार आहे.  

8/9

घराची किंमत तब्बल 45 कोटी

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

पूजा हेगडेच्या नवीन घराची किंमत तब्बल 45 कोटी रुपये असल्याचे बोललं जात आहे. 

9/9

‘देवा’ चित्रपटात झळकणार

Actress Pooja Hegde Buys sea-facing Luxury Property In Mumbai Bandra know the price

दरम्यान, पूजा हेगडे लवकरच क्राइम थ्रिलर असलेल्या ‘देवा’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत शाहिद कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. याआधी ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली होती. तसेच तिने प्रभाससोबत राधे श्याम या चित्रपटात दिसली होती.