विमानातील तो खास क्षण, 'जय सिया राम' म्हणत स्वागत अन्... ऋषी सुनक, अक्षता मुर्तींचे भारतातील Photos Viral

Rishi Sunak Akshata Murthy : नवी दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-20 परिषदेसाठी ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी तसेच इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मुर्ती यांची मुलगी अक्षता मुर्ती हे दोघेही शुक्रवारी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी भारतात आले. या दोघांचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरच टाकलेली ही नजर...

| Sep 09, 2023, 12:02 PM IST
1/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मुर्ती सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांचे काही खास फोटो व्हायरल झालेत त्यावरच नजर टाकूयात... 

2/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

नवी दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी होत असलेल्या जी-20 देशांच्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबरच तुर्की, बांगलादेश, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख नेत्यांचं शुक्रवारी भारतात आगमन झालं. या सर्वांमध्ये मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले भारतीय वंशाचे ऋषी सुनक.

3/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

ऋषी सुनक यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांची मुलगी अक्षता मुर्ती भारतात आले आहेत. हे दोघे भारतामध्ये लॅण्ड होण्याआधी विमानात काढण्यात आलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

4/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

दिल्ली विमानतळावर ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता यांचं स्वागत ग्राहक प्रकरण, अन्न व पुरवठा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केलं. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारस ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीचं दिल्लीत आगमन झालं. चौबे यांनी जय सिया राम म्हणत ऋषी सुनक यांचं स्वागत केलं. त्यावर सुनक यांनीही जय सिया राम म्हणत नमस्कार केला.

5/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आपण या जी-20 च्या बैठकीमध्ये काही खास उद्देशांनी सहभागी झालो आहोत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय संबंध दृढ करणे आणि दुर्बल घटकांना पाठिंबा देण्यासारखे मुद्दे आहेत असं ऋषी सुनक म्हणाले.

6/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

ऋषी सुनक आणि अक्षता यांनी नवी दिल्लीमध्ये काही मुलांचीही भेट घेतली. जागतिक नेत्यांना भेटण्याआधी आम्ही भविष्यातील नेतृत्वाची भेट घेतली असं म्हणत या दोघांनी या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत.

7/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

"पुतिन जी-20 मध्ये पुन्हा एकदा अनुपस्थित आहेत. मात्र आम्ही युक्रेनला पाठिंबा देत राहू," असं ऋषी सुनक यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन म्हटलं आहे. दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर ऋषी सुनक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या विकासासंदर्भात आणि सहकार्यासंदर्भात चर्चा झाली.

8/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये ऋषी सुनक आणि अक्षता मुर्ती यांचा विमान भारतात लॅण्ड होण्यापूर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत ऋषी सुनक आणि अक्षता हे विमानामध्ये उभे असून अक्षता मुर्ती ऋषी सुनक यांची टाय ठीक करत असल्याचं दिसत आहे.

9/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

ऋषी सुनक यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी यावरुन सासरवाडीचा संदर्भ दिला आहे. सासरवाडीत जावयाचा लूक उत्तम असावा म्हणून अक्षता मुर्ती प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

10/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

भारतात दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ऋषी सुनक यांनी मला मी हिंदू असल्याचा फार अभिमान आहे असंही म्हटलं आहे.

11/11

G20 Meet Beautiful Pictures Of UK PM Rishi Sunak and Akshata Murthy

आज आणि उद्या नवी दिल्लीमधील प्रगती मैदान येथे मागील महिन्यातच उद्घाटन करण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये ऋषी सुनक यांच्याबरोबरच जी-20 मध्ये सहभागी झालेल्या देशांचे प्रमुख नेते बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.