मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?

Mumbai House Reservation: मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होतंय. ते रोखण्यासाठी.   

Jun 25, 2024, 12:14 PM IST
1/7

. मराठी माणसांची कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट खरेदी करण्याची ऐपत असूनही बिल्डरकडून त्यांना घरं विकली जात नाहीत... याविरोधात मराठी माणसानं अनेकदा आवाज उठवला... आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना मराठी माणसांचा पुळका आलाय.

2/7

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने मागणी केली आहे. उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला भाजपने लगावला आहे. 

3/7

मुंबईतील अनेक उत्तुंग टॉवरमध्ये एका विशिष्ट समाजाच्या लोकांनाच घरं दिली जातात असा आरोप केला जातो. 

4/7

मराठी माणसांना मांसाहार, धर्माच्या आधारावर घरं नाकारता येणार नाहीत. 

5/7

मराठी माणसांसाठी घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित बिल्डरची असेल. 

6/7

बिल्डरनं तसं न केल्यास 6 महिने तुरुंगवास, 10 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. 

7/7

अनिल परबांकडून अशासकीय विधेयक सादर