Tulsi Vivah Rangoli Designs: तुळशी विवाहादिवशी दारासमोर काढा सुंदर, सुबक आणि अतिशय सोपी रांगोळी, डिझाइनसाठी पाहा फोटो

Tulsi Vivah Rangoli Designs: तुळशी विवाहाला देवउठणी एकादशी म्हणतात. यावेळी 13 नोव्हेंबर रोजी 'तुळशी विवाह' साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी, जर तुम्ही तुमच्या घराच्या दारासमोर रांगोळी काढणार असाल, तर तुम्ही या रांगोळीच्या डिझाईनमधून आयडिया देखील घेऊ शकता.

| Nov 13, 2024, 12:28 PM IST

तुळशी विवाहाला देवउठणी एकादशी म्हणतात. यावेळी 13 नोव्हेंबर रोजी 'तुळशी विवाह' साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी, जर तुम्ही तुमच्या घराच्या दारासमोर रांगोळी काढणार असाल, तर तुम्ही या रांगोळीच्या डिझाईनमधून आयडिया देखील घेऊ शकता.

1/7

तुळशी विवाह हे प्रत्येक प्रांतात वेगळे असते. या दिवशी उसाची कांडी दाराजवळ लावतात. त्याचपद्धतीची रांगोळी तुम्ही दारात काढू शकता. 

2/7

खडूच्या साहाय्याने प्रथम दारासमोर मध्यभागी तुळशीचे वृंदावन तयार करा. आता यानंतर वृंदावनाच्या तळाशी फुले, पाने आणि दिवा बनवा. हे सर्व आकार तयार केल्यानंतर त्यात रंग भरून वरच्या भागात तुळशीचे रोप तयार करावे. यासाठी तुम्ही खऱ्या फुलांचा देखील समावेश करु शकता. 

3/7

तुळशीच्या शुभ विवाहासाठी कलशाने सजवलेली रांगोळी तयार करु शकता. यासाठी प्रथम तुळशीचे भांडे आणि त्याच्या पुढे वर्तुळ तयार करा. आता भांडे आणि वर्तुळामध्ये कलशाचा आकार बनवा. साधी डिझाईन बनवल्यानंतर इअरबड्सच्या मदतीने डिझाइन पूर्ण करा.

4/7

रांगोळीच्या या डिझाईनवरून तुम्ही कल्पनाही घेऊ शकता. या डिझाइनच्या मदतीने तुम्ही खऱ्या फुलांची देखील रांगोळी तयार करु शकता.  यामध्ये लाल रंगाने वर्तुळाकार बनवून त्यामध्ये तुळशीचे रोप लावण्यात आले आहे. हे शुभविवाह आहे असेही लिहिले आहे. 

5/7

रांगोळीची ही डिझाइन अतिशय सुंदर आणि साधी आहे. यामध्ये खरी तुळशीची पाने वापरल्यामुळे त्याला जीवंतपणा आला आहे. निळ्या रंगाचे भांडे बनवले असून पांढऱ्या रंगात डिझाईन तयार करण्यात आले आहे. तसेच केशरी आणि पिवळ्या रंगात एक वर्तुळ तयार करून त्यावर तुळशीची पाने ठेवण्यात आली आहेत.

6/7

रांगोळीची ही डिझाइन तुळशी विवाहासाठी सर्वोत्तम असेल. यामध्ये तुळशीच्या रोपाला हिरवा रंग देण्यात आला आहे. यानंतर बासरी आणि मोराची पिसे बनवण्यात आली आहेत. याशिवाय विवाहबंधनाची जोड दाखवण्यात आली आहे.   

7/7

रांगोळीची ही रचना अतिशय सुंदर आणि अद्वितीय आहे. यामध्ये तुळशीला एका महिलेचे स्वरुप दिले आहे. तुळस ही एका सुंदर नववधु स्त्री प्रमाणे दाखवण्यात आली आहे. दारासमोर किंवा अंगणात तुळशी विवाहाला ही रांगोळी काढा.