छोट्या कुटुंबासाठी बेस्ट कार, किंमत 3.99 लाख, 34 किमी मायलेज

तुम्ही देखील कार घेण्याचे स्वप्न बघत आहात. आम्ही देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कारची यादी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Nov 12, 2024, 16:09 PM IST
1/7

ड्रीम कार

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं की आपल्या कुटुंबासाठी एक लहान कार असावी. ड्रीम कारमध्ये लाँग ड्राईव्हला जायचे. 

2/7

स्वप्न

परंतु काही वेळा गाड्यांच्या वाढत्या किमती आणि कमी बजेटमुळे लोकांचे हे स्वप्न पू्र्ण होत नाही.

3/7

किंमत 5.54 लाख

मारुती वॅगनआर 1 लिटर आणि 1.2 लिटर या दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. यामधील पेट्रोल कार 24.35 किमी मायलेज देते तर CNG मधील कार 34.05 किमी मायलेज देते. 

4/7

किंमत 5.37 लाख

मारुति सेलेरियो ही कार 1 लिटर पेट्रोल इंजनसह येते. कंपनीचा दावा आहे की पेट्रोल कार 26.68 किमी मायलेज देते. तर CNG कार 34.43 किमी मायलेज देते. 

5/7

किंमत 4.26 लाख

मारुति एस-प्रेसोमध्ये देखील 1 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामधील पेट्रोल कार 25.30 किमी मायलेज देते. तर CNG कार 32.73 किमी मायलेज देते. 

6/7

किंमत 4.70 लाख

रेनो क्विड ही कार देखील 1 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. परंतु या कारमध्ये CNG पर्याय नाहीये. मात्र, ही कार 20 ते 21 किमी लिटर मायलेज देते. 

7/7

किंमत 3.99 लाख

देशातील सर्वात स्वस्त कार ऑल्टो K10 मध्ये 1 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये येते. यामधील पेट्रोल कार 24.39 किमी मायलेज देते. तर CNG कार 33 किमी मायलेज देते.