'भाभी नंबर 2' तृप्ती डिमरीनं मुंबईत खरेदी केला आलिशान बंगला, आहे 'इतकी' किंमत

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीची लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तिचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये का की तृप्तीचा आनंद हा गगनात मावेना असा झाला आहे. त्याचं कारण तृप्तीनं एक आलीशान बंगला खरेदी केला आहे. चला तर जाणून घेऊया त्याविषयी काही खास गोष्टी....  

Diksha Patil | Jun 08, 2024, 13:01 PM IST
1/7

तृप्ती डिमरी

तृप्ती डिमरीला संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली. त्याआधी देखील तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण खरी लोकप्रियता ही या चित्रपटातून मिळाली. 

2/7

काय आहे किंमत?

तृप्तीनं घेतलेल्या या आलीशान बंगल्याची किंमत 14 कोटींच्या जवळपास असल्याचे म्हटले जाते. 

3/7

कुठे खरेदी केला हा बंगला?

IndexTap.com नुसार, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटमध्ये कळलं की हा बंगला मुंबईच्या वांद्रे परिसरातील कार्टर रोड परिसरात आहे. तर तृप्तीचा हा बंगला ग्राऊंड प्लस दोन माळे असा आहे. 

4/7

किती आहे एरिया?

तृप्तीनं या बंगल्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 70 लाख रुपये दिल्याचे म्हटले जाते. तर तिचा हा बंगला 2,194 स्क्वेअर फीट आणि बिल्टअप एरिया 2,226 स्क्वेअर फीटमध्ये पसरला आहे. दरम्यान, तिनं रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार रुपये खर्च केल्याचे देखील म्हटले जाते.  

5/7

कधी केलं पदार्पण?

उत्तराखंडची मुळची असलेल्या तृप्ती डिमरीनं 2017 मध्ये श्रेयस तळपदेच्या 'पोस्टर बॉयज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

6/7

... अन् त्यानंतर तृप्तीची चर्चा

त्यानंतर तृप्ती आणखी काही चित्रपट केले मात्र, तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र,  'बुलबुल' आणि 'कला' या चित्रपटानंतर तृप्ती डिमरी चर्चेत आली होती. 

7/7

आगामी प्रोजेक्ट्स

'अ‍ॅनिमल' या चित्रपटानं ती एका रात्रीत स्टार झाली. आता तिच्याकडे 4 चित्रपट आहेत. धडक 2 शिवाय ती 'बॅड न्यूज', 'विक्की विद्या का वो वाला वीडियो' आणि 'भूल भुलैया 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.