Modi Cabinet Photo : नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील 'या' नेत्यांची वर्णी? संभाव्य यादी समोर

Maharashtra Modi Cabinet List : रविवारी 9 जूनला नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली. 

Jun 08, 2024, 13:23 PM IST
1/9

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजप, शिंदे गट, अजित पवार गटातील खासदार शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

2/9

राज्यात लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळवता आला. अशात मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधवांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

3/9

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत फक्त भोपळा फोडता आला. त्यांना एका जागेवर समाधान मानावं लागलं. मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत आहे.

4/9

तर लोकसभा निवडणूक भाजपला 10 जागांवर विजय मिळाला. विदर्भात फक्त नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलं. बाकी 8 जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. अशात मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून नितीन गडकरी यांना संधी मिळणार आहे. 

5/9

रक्षा खडसे आणि नारायण राणे यांची देखील वर्णी लागणार, अशी सूत्रांची माहिती आहे. 

6/9

त्याशिवाय शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे किंवा संदीपान भूमरे यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. 

7/9

उदयनराजे भोसले आणि हेमंत सावरा किंवा स्मिता वाघ यांच्याही नावांची चर्चा आहे. मोदी मंत्रिमंडळात नेमक्या कोणत्या खासदारांना संधी मिळते हे वेळेच सांगेल. 

8/9

तर दुसरीकडे मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात पीयूष गोयल यांचं नाव संभाव्य यादीत असल्याच सूत्रांनी सांगितलंय. 

9/9

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा रविवारी 9 जूनला संध्याकाळी सव्वासात वाजता शपथ घेणार आहेत.