हातात ट्रॉफी अन् गळ्यात मेडल...पाहा कशी होती टीम इंडियाच्या खेळाडूंची भारतात एन्ट्री; Inside Pics

Surabhi Jagdish | Jul 04, 2024, 08:39 AM IST
1/7

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया अखेर भारतात परतली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ट्रॉफी भारतात आली आहे.

2/7

वेस्ट इंडिजवरून खास चार्टड फ्लाईटने टीम इंडिया गुरुवारी दिल्ली एअरपोर्टवर पोहोचली आहे. 

3/7

यामध्ये रोहित शर्माच्या हातात टी-20 वर्ल्डकप विजयाची ट्रॉफी दिसतेय.   

4/7

याशिवाय विराट कोहली आणि ऋषभ पंत देखील एअरपोर्टवर उतरण्याची तयार करताना दिसतायत. 

5/7

यावेळी एका फोटोमध्ये रोहित शर्माची मुलगी समायरा दिसत असून तिच्या मागे जसप्रीत बुमराह आहे. 

6/7

सूर्यकुमार यादवचा फोटो देखील व्हायरल होत असून त्याच्या गळ्यात विजयाचं मेडल आहे. 

7/7

त्यामुळे अखेरीस आता टीम इंडिया वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन भारतात परतली आहे.