अवकाशातील चंद्र भारतात पाहता येतोय; हिमालयाच्या कुशीत दडलंय मोठं रहस्य
Travel News : तुम्हीही या चंद्राच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहात का? चंद्राची एक झलक पाहून तुम्हीही भारावता का?
Chandrayaan 3 मुळं चंद्राबाबतची (Moon) अनेक रहस्य आपल्या समोर आली. चंद्राचा पृष्ठ कसा दिसतो इथपासून चंद्रावर वादळ, भूकंप कसे येतात इथपर्यंतची माहिती इस्रोच्या या मोहिमेमुळं मिळाली आणि खऱ्या अर्थानं चंद्र जवळ आला.
1/7
हा चंद्र तुमच्या स्वागतासाठी सज्ज
तुमचा विश्वास बसणार नाही, पण भारतातही तुमच्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावरच चंद्र दडलाय. निसर्गाच्या कुशीत, हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हा चंद्र तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. अद्वितीय आणि अविश्वसनीय सौंदर्यानं परिपूर्ण असणारा आणि निस्सिम शांतता असणारा हा चंद्र आहे बर्फानं अच्छादलेल्या पर्वतांच्या कुशीत. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh).
2/7
चंद्र ताल
3/7
पवित्र ठिकाण
4/7
तलावाची गूढता
चंद्र तालच्या पाण्याचे बदलते रंग त्याची गूढता आणखी वाढवताना दिसतं. समुद्रसपाटीपासून 14,100 फूटांच्या उंचीवर हा तलाव असून, स्पितीच्या खोऱ्यातील कुंझुम पासपासून तो हाकेच्या अंतरावर आहे. आजुबाजूला गवताळ प्रदेश असल्यामुळं इथं तुम्हाला पांढऱ्या शुभ्र वर्णाचे घोडे आणि तत्सम प्राणी मुक्त संचारही करताना दिसतात. हे दृश्य कोणा एका चित्रकारानं साकारलेल्या चित्राहून कमी नाही.
5/7
चंद्रा नदीचं उगमस्थान
6/7