आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 क्रिकेटर

Jul 15, 2020, 12:56 PM IST
1/5

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात करणाऱ्या क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन सचिनपासून सुरुवात करूया. 24 वर्षांच्या त्यांच्या दीर्घ कारकीर्दीत, त्याने आपल्या संघाचे आणि देशाचे नाव वर नेले. मास्टर ब्लास्टरने आपल्या कारकीर्दीत एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने अनेक विक्रम नोंदवले. सचिनने आंतरराष्ट्रीय 100 शतकांसह एकूण 34,357 धावा केल्या. यापैकी एकदिवसीय मालिकेत त्याने 49 शतके आणि कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके ठोकली. सचिन तेंडुलकरने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 आणि 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा नोंदवल्या आहेत. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टरने फक्त एक टी -20 सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 10 धावा केल्या. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज होता.

2/5

कुमार संगकारा

कुमार संगकारा

या यादीमध्ये श्रीलंकेच्या आणखी एका महान फलंदाजाच्या नावाचा समावेश असून तो कुमार संगकारा आहे. कव्हर ड्राईव्हपासून ते फ्लिक्सपर्यंत प्रत्येक शॉटमध्ये तो तज्ज्ञ होता. संगकाराने आपल्या 15 वर्षांच्या कारकीर्दीत प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. 2000 ते 2015 पर्यंत त्याने 594 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 28,016 धावा केल्या. यात 134 कसोटी, 404 वनडे आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. या सामन्यात संगकाराने 63 शतके आणि 153 अर्धशतके झळकावली होती.

3/5

रिकी पाँटिंग

रिकी पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या बॅटींगने संपूर्ण जगात आपलं नाव कमावलं. ऑस्ट्रेलियाकडून तो सर्वाधिक रन करणारा बॅट्समन आहे. पाँटिंगने 17 वर्षाच्या करियरमध्ये 560 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 27,483 रन केले. 1995 ते 2012 पर्यंत त्याने एकूण 71 शतक ठोकले. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक ठोकणाऱ्या यादीत सचिननंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे. पाँटिंगने 17 टी-20 सामने देखील खेळले आहेत.

4/5

महेला जयवर्धने

महेला जयवर्धने

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेला फलंदाजांमध्ये उच्च स्थान देण्यात आले आहे. कुमार संगकारासह जयवर्धने याने देखील आपल्या संघाला उंच स्थानावर नेले. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण 652 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 54 शतके आणि 136 अर्धशतकांच्या मदतीने 25,857 धावा केल्या. महेला जयवर्धनेने कसोटी सामन्यात 11,814 धावा, एकदिवसीय सामन्यात 12,650 धावा तसेच टी -20 मध्ये 1,493 धावा केल्या आहेत.

5/5

जॅक कॅलिस

जॅक कॅलिस

आकडेवारीनुसार जॅक कॅलिसला आतापर्यंतचा जगातील सर्वांत महान अष्टपैलू खेळाडू मानले जाते. त्याने केवळ आपल्या फलंदाजीने आश्चर्यकारक कामगिरी केली नाही तर त्याची गोलंदाजीही दमदार होती. जॅक कॅलिसने 19 वर्षांच्या कारकीर्दीत 519 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25,534 धावा केल्या आणि त्यांच्या नावावर 577 विकेट्स ही आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या या चमकदार खेळाडूने 62 शतके आणि 149 अर्धशतके ठोकली आहेत. कॅलिसने कसोटीत 13289 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 11,579 धावा तर 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 666 धावा केल्या आहेत.