10 वर्षांचा असताना मुंबईत आला, टेंटमध्ये राहून घेतलं क्रिकेटचं ट्रेनिंग, आज राहतोय 5 कोटींच्या आलिशान घरात

Yashavi Jaiswal : टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल 28 डिसेंबर रोजी त्याचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या यशस्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमध्ये खेळत असून तो मेलबर्नमध्ये टीम इंडिया सोबत त्याचा वाढदिवस साजरा करेल. यशस्वी जयस्वाल आता यशाची शिखर गाठत असला तरी त्याच लहानपण अतिशय कष्टात गेलं. तेव्हा यशस्वी जयस्वालच्या करिअर आणि सध्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात.   

| Dec 28, 2024, 12:54 PM IST
1/7

यशस्वी जयस्वालचा जन्म 28 डिसेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशच्या भदोही येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. यशस्वी हा त्याच्या घरी सर्वात लहान होता. त्याचे वडील भूपेंद्र जयस्वाल यांचं हार्डवेयर स्टोअर होतं तर त्याची आई कांचन जयस्वाल या गृहिणी होत्या. वयाच्या 10 व्या वर्षी तो मुंबईत आला आणि आझाद मैदानावर त्याने क्रिकेटचं ट्रेनिंग घेतलं. यावेळी त्याला टेंटमध्येही अनेक रात्री काढाव्या लागल्या. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये स्ट्रगल केल्यावर त्याला 2023 मध्ये भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. 

2/7

यशस्वी जयस्वालने 2023 मध्ये भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी त्याने पहिल्याच इनिंगमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झळकावले. यामुळे तो पदार्पणात शतक ठोकणारा भारताचा 17 वा फलंदाज ठरला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉनंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा ओपनर ठरला होता.

3/7

सतत करत असलेल्या चांगल्या परफॉर्मन्समुळे जयस्वालला टीम इंडियात संधी मिळत गेली आणि तो आता टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा एक महत्वाचा भाग आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात त्याने 82 धावांची खेळी केली होती. 

4/7

यशस्वी जयस्वालने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये 18 सामने खेळले असून यापैकी 33 इनिंगमध्ये त्याने 1682 धावा केल्या आहेत. यात 4 शतक, 2 द्विशतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने वनडे क्रिकेटमध्ये 23 सामन्यात 723 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 

5/7

यशस्वी जयस्वालकडे बीसीसीआयचं वार्षिक कॉन्ट्रॅक्ट असून यात तो बी ग्रेडच्या फलंदाजांमध्ये मोडतो. यासाठी यशस्वीला वर्षाला 3 कोटी रुपये मिळतात. 2020 आयपीएलमध्ये यशस्वीने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. यावेळी त्याला एका सीजनसाठी जवळपास  2. 40 कोटी मिळाले. 2022 ला हीच रक्कम वाढून 4 कोटी झाली.  

6/7

यशस्वी जयस्वालची ब्रँड व्हॅल्यू वाढत असून तो अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसून येतोय. सध्या यशस्वीकडे  बोट, जेबीएल इंडिया आणि फायरबोल्ट अशा कंपन्यांचा समावेश आहे. 

7/7

23 वर्षांच्या यशस्वी जयस्वालकडे महिंद्रा थार, टाटा हारियर आणि मर्सिडीज बेंज सीएलए 200 या गाड्यांचा कलेक्शन आहे. कधीकाळी आझाद मैदानावरील टेंटमध्ये रात्र काढावी लागलेल्या यशस्वी जयस्वालने मुंबईच्या जवळ 5 कोटींचं आलिशान घर देखील विकत घेतलं आहे.