'या' आहेत Top 5 110cc Scooters, बजेटसह मायलेजही कमाल

Top 5 110cc Scooters : बाईकप्रमाणंच स्कूटरमध्येही हल्ली बरेच प्रकार आणि बहुविध फिचर्स आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. यातही 110cc च्या स्कूटरना विशेष पसंती. 

May 09, 2023, 13:26 PM IST

Top 5 110cc Scooters : देशात मागील काही वर्षांमध्ये दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. यामध्ये कार्गो बाईक्स आणि सर्वसामान्य बाईक्ससोबतच प्राधान्य मिळत गेलं ते म्हणजे स्कूटरला. कुठंही न्यायला सोयीची अशी ही स्कूटर खिशालाही सहज परवडणारी

1/7

स्कूटर घ्यायच्या विचारात आहात का?

Top 5 110cc Scooters names and features of models

तुम्हीही येत्या दिवसांमध्ये एखादी स्कूटर घ्यायच्या विचारात आहात का? याआधी काही पर्याय आणि त्यांची वैशिष्ट्य लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सर्वोत्तम पर्याय निवडणं आणखी सोपं होईल

2/7

Scooters

Top 5 110cc Scooters names and features of models

तुमचा वापर, इंधनासाठी खर्च करण्याची तुमची तयारी आणि तुम्ही किती अंतरापर्यंत ही स्कूटर नेणार या सर्व गोष्टींबाबत हे पर्याय पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल. 

3/7

Honda Activa

Top 5 110cc Scooters names and features of models

Honda Activa (होंडा एक्टिवा) ही सध्याच्या घडीला भारतात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. Activa 6G मध्ये तुम्हाला 109.51cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळतं. ज्यातून 7.73 bhp पॉवर जनरेट होते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 75347 ते 81348 च्या घरात आहे. 

4/7

TVS Jupiter

Top 5 110cc Scooters names and features of models

साधारण 72,190 ते 88,498 इतकी एक्स शोरूम किंमत असणाऱ्या या स्कूटरमध्ये 109.7cc इंजिन आहे. इथं 7.7 bhp पॉवर जनरेट होऊन  CVT गियरबॉक्सही मिळतो. 

5/7

Hero Pleasure Plus

Top 5 110cc Scooters names and features of models

Hero Pleasure Plus (हीरो प्लेजर प्लस) ची एक्स शोरून किंमत 69,638 ते 78,538 रुपयांदरम्यान आहे. 110.9cc इंजिन असणाऱ्या या स्कूटरमध्ये 7.9 bhp पॉवर आणि  8.70 Nm चं टॉर्क जनरेट होतं.   

6/7

Honda Dio

Top 5 110cc Scooters names and features of models

Honda Dio (होंडा डियो) हासुद्धा स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. इथं 109.51cc इंजिन असून, ते 7.6 bhp पॉवर आणि 9 Nm टॉर्क जनरेट करतं. साधारण 68,625 ते 72,626 इतक्या एक्स शोरुम दरात तुम्हाला ही स्कूटर विकत घेता येईल. 

7/7

Hero Xoom

Top 5 110cc Scooters names and features of models

110 सीसी स्कूटरच्या रांगेत हे नाव हल्लीच प्रसिद्धीझोतात आलं आहे. यामध्ये तुम्हाला 110 सीसी फ्यूल इंजेक्टेड इंजिन मिळतं.  69,099 ते 77,199  इतकी या स्कूटरची एक्स शोरून किंमत आहे.