विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या खेळाडूची सुट्टी! संघाने दाखवला बाहेरचा रस्ता; RCB च्या जुन्या खेळाडूला संधी

IPL 2023: मैदानात विराट कोहलीशी (Virat Kohli) वाद घालणारा अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक (Naveen Ul Haq) याला एका सामन्यानंतरच बाहेर बसवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जविरोधात (Chennai Super Kings) झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली होती. मात्र , एका सामन्यानंतरच त्याला विश्रांती देण्यात आली आहे.   

| May 09, 2023, 12:57 PM IST
1/7

IPL 2023: मैदानात विराट कोहलीशी (Virat Kohli) वाद घालणारा अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक (Naveen Ul Haq) याला एका सामन्यानंतरच बाहेर बसवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जविरोधात (Chennai Super Kings) झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली होती. मात्र , एका सामन्यानंतरच त्याला विश्रांती देण्यात आली आहे.   

2/7

1 मे रोजी झालेल्या लखनऊ संघाविरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने विरोधी संघाच्या खेळाडूंशी वाद घातला आहे. या वादात गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) उडी घेतली होती.   

3/7

1 मे रोजी लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना पार पडला होता. यावेळी विराटचा अमित मिश्रा, नवीन उल हक आणि कायले मेयर्स यांच्यासोबत वाद झाला होता. सामना संपल्यानंतर विराटचा लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरसोबतही शाब्दिक वाद झाला होता. या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचं 100 टक्के मानधन काढून घेण्यात आलं होतं.   

4/7

दरम्यान विराटशी वाद घातल्याने अफगाणिस्ताना गोलंदाज नवीन उल हक याच्या नावाची  चांगलीच चर्चा रंगली होती. पण एका सामन्यानंतर त्याला बाहेर बसावं लागलं आहे. पावसामुळे चेन्नईविरोधातील रद्द झालेल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आला होती. पण एका सामन्यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.   

5/7

लखनऊ संघाने गुजरातविरोधात झालेल्या सामन्यात नवीन उल हकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. त्याच्या जागी परदेशी खेळाडू म्हणून गौतम गंभीरने यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डीकॉकला संधी देण्यात आली. सामन्याची सुरुवात करताना त्याने जबरदस्त खेळी केली. त्याने 41 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 70 धावा ठोकल्या.   

6/7

महत्वाचं म्हणजे विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर एकाच सामन्यानंतर नवीन उल हकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ज्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे, तो याआधी बंगळुरु संघात होता.   

7/7

2018  मध्ये क्विंटन डी कॉक बंगळुरुकडून खेळला होता. पण त्याच्यासाठी तो हंगाम फार चांगला नव्हता. 8 सामन्यात तो फक्त 201 धावा करु शकला होता. यामध्ये 53 धावांची सर्वाधिक धावसंख्या होती.