इतिहासात नोंद असलेल्या 'या' नैसर्गिक आपत्तींना जग आजही विसरलेलं नाही; विचारानंही मन सुन्न होतंय

Natural Disasters : 19 वर्षांपूर्वी अशाच एका नैसर्गित आपत्तीचं संकट जगावर ओढावलं आणि त्या कडू आठवणी आजही सर्वांना धडकी भरवताना दिसतात. हे संकट होतं इंडोनेशिया आलेल्या 9.1 तीव्रतेच्या महाभयंकर भूकंपाचं आणि त्यानंतरच्या त्सुनामीचं.   

Dec 26, 2023, 09:59 AM IST

Natural Disasters : काही गोष्ट कोणाच्याही नियंत्रणात नसतात, नैसर्गिक आपत्ती त्यापैकीच एक. निसर्गापुढं कधी कोणाचीही मनमानी चालली नाही आणि चालणारही नाही. कारण, कोणत्याही गोष्टीत मर्यादा ओलांडल्या गेल्या की हा निसर्गच धडा शिकवत आपल्याला वठणीवर आणतो. 

 

1/7

इंडोनेशियातील भूकंप

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

2004 मध्ये इंडोनेशियाच्या उत्तरेकडे 9.1 तीव्रतेचा महाभयंकर भूकंप आला. ज्याचे हादरे भारत, श्रीलंका, मालदीव आणि थायलंडपर्यंत जाणवले. हा भूकंप इतका भयावह होता की, त्याच्या तीव्रतेमुळं समुद्रात 65 फूट उंचच उंच लाटा उठल्या. एकट्या भारतात या आपत्तीचे 12 हजारहून अधिक बळी गेले. तर, एकूण मृतांचा आकडा अडीच लाखांपेक्षाही जास्त होता.   

2/7

महापूर

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

इतिहासात डोकावून नैसर्गिक आपत्तीकडे पाहायचं झाल्यास 1931 च्या ऑगस्ट महिन्यात एक विनाशकारी पूर आला होता. यामध्ये 40 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. 1887 मध्ये चीनमध्येच एक पूर आला, ज्यामध्ये 20 लाख नागरिकांचा मृत्यू ओढावला होता. 

3/7

चीनमधील भूकंप

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

1976 मध्ये चीनच्या तांगशान शहरामध्ये 8.2 तीव्रतेचा भूकंप आला आणि 23 सेकंदांच्या या भूकंपानं शहर उध्वस्त केलं. शहरातील 90 टक्के बांधकामांचं नुकसान झालं. उपलब्ध माहितीनुसार यामध्ये  655,000 नागरिकांचा मृत्यू ओढावला होता.   

4/7

भोला वादळ

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

1970  मध्ये बांगलादेशमध्ये आलेल्या एका महाभयंकर 'भोला' वादळामध्ये 500000 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. 

5/7

हैती

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

2010 मध्ये हैतीमध्ये आलेल्या 7.0 तीव्रतेच्या भूकंपामुलं शहर उध्वस्त झालं होतं. या भूकंपानंतर कैक वर्षांसाठी नागरिकांना तंबूंमध्ये राहावं लागलं होतं.   

6/7

तुर्कीतील भूकंप

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

इसवी सन 526 मध्ये तुर्कीतील अंताक्‍या शहराला भूकंपाचा हादरा बसला होता. इतिहासकार जॉन मलालास यांनीसुद्धा त्यांच्या  'क्रॉनिकल'मध्ये या संकटाचा उल्लेख केला होता. 

7/7

हिंदी महासागरातील चक्रीवादळ

top  10 natural disasters rememberig 26 Dec 2004 tsunami calamity

कैक वर्षे मागं म्हणजेच 1737 मध्ये डोकावलं असता एका भयावह वादळाचं दाहक वास्तव समोर येतं. कारण हे होतं उत्तर हिंदी महासागरात आलेलं पहिलं चक्रीवादळ.