श्री दत्त परिक्रमेतील भारतातील या प्रमुख क्षेत्रांना नक्की भेट द्या

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा 24 दत्त क्षेत्र आहेत. ही ठिकाणं तसेच दत्त परिक्रमेतील महाराष्ट्रातील ठिकाणांबद्दल सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 10:00 AM IST

 संपूर्ण भारतभर शेकडो दत्त क्षेत्र आहेत, यापैकी प्रमुख 24 दत्त क्षेत्र मानली जातात.  

1/11

 संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्र आहेत, मात्र दत्त परिक्रमेतील ही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत.

2/11

 महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते.

3/11

दत्त परिक्रमेतील भारतातील ही प्रमुख क्षेत्रे. 

4/11

माहूर :

महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात हे क्षेत्र आहे. 

5/11

गिरनार :

 जुनागडजवळ, सौराष्ट्र. याला १० सहस्त्र पायर्‍या आहेत.

6/11

पीठापूर :

आंध्रप्रदेश. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान. 

7/11

कुरवपूर :

कर्नाटक. रायचुरहून मोटारीने पल्लदिनीपर्यंत (कुरगुड्डी) जाता येते. पुढे कृष्णेच्या पाण्यात हे बेट आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्यस्थान आहे. 

8/11

कारंजा :

श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. लाड-कारंजे हे याचे दुसरे नाव होय. काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्तमंदिर उभारले.

9/11

औदुंबर :

्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास-निवास केला होता. हे ठिकाण महाराष्ट्रातील भिलवडी पासून १० कि.मी. अंतरावर सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठी आहे.

10/11

नरसोबाची वाडी :

हे महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात असून श्री नृसिंह सरस्वती इथे बारा वर्षे राहिले. 

11/11

गाणगापूर :

हे क्षेत्र पुणे-रायचुर या मार्गावर  आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे श्री नृसिंह सरस्वतींनी तेवीस वर्षे वास्तव्य केले आणि त्यांनी इथेच समाधी घेतली.